Friday, September 2, 2022

टाहोंचे अरण्य....


झाली का रेखून तुझ्या
आर्त कवितेची पाने?
घे काळजातले शब्द
टिपून मुक मनाने

ओळी मागून ओळी
चालून येतील हाती
मी धारून घेईन ओला
भाव तुझा मग माथी

टाहोंच्या अरण्यात या
मी रोपेन तुझे भाव
तुडवीत राहीन रस्ता
घेत तुझ्या हाकांचे ठाव...



༄᭄प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
०२.०९. २०२२
















No comments:

Post a Comment

अत्त दिप भव!

शाक्यमूनी तथागता! वैशाख पोर्णिमेस तू पद्मफूलावर पाय देत अवतरलास ! मात्र ! बूध्दत्व साधण्यासाठी तू धुंडाळलेस कितीतरी काटेरी मार्ग! निकराने नि...