Sunday, September 25, 2022

समा


फकीर
अस्वस्थ होत आहे
पुटपुटतो आहे
'खफी' मनातल्या मनात
'तुम अलग हो'
जुदा हो हमसे
फिर भी दिल
जुड गया ।

मी: बाबा!
जुदा कैसे?
मै भी आप जैसा ।
माझ्यातही आहे एक 'दरवेश'
जो करतो नित्य 'जियारत'
माझ्याच 'मजारी' ची..
आणी 'माझ्या' हाकांचे 'उरूस'
मी रोजच मनवतो
मेरा 'तरीका' ओ है,
मेरा'सिलसिला' भी ओ।
बस बुलाता नही मुझे ओ
कधी आपल्या 'खानकाह'वर
मी 'मुरिद' आहे तीचा
हे माहिती असुनही
फक्त बनत नाही ती माझी'मुर्शिद'!

फकीर - 'समा' गाने को दिल कर रहा है अब ।
'समा' जानते हो?
मी : बाबा जर मी म्हणत असेन
आपण आहोत सारखे
कसे होऊ आपण
शब्दा पासून पारखे?

तुम्ही समा गा आर्जवे करा
माझी कविताच माझी समा
इबादत माझी अमिट मला
जन्नत,जहन्नुम ची न तमा ।

मै तो बैठता भी हूँ
देखकर उसकी छाँव ।
मी पुजताना तिला हृदयातुन
जततो सुन्नत भाव.
फकीर - पुरे अवलिया हो।

मी : काय माहिती कोण करेल
माझी शिफारीश?
मी 'सलाम'ही करतो
फक्त तिलाच !!
फकीर: इबादत सच्ची है तुम्हारी।
मी : लेकिन सब्र कबतक??

फकीर- तेरा खुदा जाने।
तु जाने ।
तो गातो आहे 'समा'
माझ्या व्याकुळ गीताचे शब्द घेवून....

༄᭄प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२६.०९. २०२२


No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...