Sunday, September 11, 2022

हिजरत...


सहप्रवाशी फकिर म्हणाला;
"ए बंदे! कसली आस घेवून
तु करतो आहेस ही हिजरत
तुडवतो आहेस हा
अवघड रस्ता?
तुझा ईश्वर तरी कोणता?
त्याची आराधना कोणती?
व्याकुळतेत तर तु मलाही
पिछाडलंस...!!"

मी निरव शांती राखत
तुझ्या दिशेच्या रस्त्यावर
चिरपरिचीत नजर रोखून
त्याला दिली
तुझ्यावरची कविता
नजरेखालून घालण्यासाठी.....

सजदा करून ,तो म्हणाला;
"या अल्लाह!
इतनी तडप काश मुझमे होती
तु दौडा आता मेरे पास...!!"

त्याने हात उंचवून
दुवा मागीतली
"जा तुझे तेरा खुदा मीले
तेरी हिजरत काम आए"

मी शब्द शब्द जोडत
चालतो आहे
तेंव्हा पासून......
तुझ्या दिशेला....

༄᭄प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
११.०९. २०२२





No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...