Wednesday, September 7, 2022

मारिची भुल


अशोकवनी ओढीने
शब्द माझे शोकाकुल
का पडते मजला तुझी
नित्य मारिची भुल?

बांधेल कोणी सेतु
दाखवेल ओळखखुण?
सागरात तरत्या दगडांना
येईल आवेगी धुन?

देऊ का अग्निपरीक्षा
तु मला सोडवण्यासाठी?
हृदयातल्या कप्प्याच्या
सोडत माणिकगाठी

घे मला कुशिला असे जणू
भुई ने जानकी धारावी
तुझ्या पदस्पर्शाने अहिल्येतुन
शिळ दुर सारावी

लिहू का महाकाव्य आपले
युगांती चालणारे?
आत्म्याचे अंतरद्वार
अलगद खोलणारे......
༄᭄प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
०८.०९. २०२२









No comments:

Post a Comment

तोडून...?

गोकुळ निघाले मथुरा अनाथ झाल्या गायी राधा हृदय चालले कृष्ण दिशेने पायी येईल परतून कान्हा देईल हाक हासरी? की थेट वृंदावनी मूक्ती तोडून प्राणप्...