गगनहाकेवर येते
तुझे चांदणे निळे
पाताळात बहरते
चंद्रोदयाचे तळे
दारात थबकते सांज
खिडकीला वारा शिवे
तमास माझ्या तुझे
प्रकाशकवडसे हवे
उदास दिव्यांच्या संगे
शब्दांना थरथर सुटते
दुर शिवारा तमोघडीला
हळवी भाषा फुटते
शब्दामागे निघतो
पेरत सांजगीताचे सुर
सजनखुणांचे ठसे
उमटत असता दुर
आभाळ ओंजळ भरते
न पसरता हात
कुर्बानीत जळताना
मंद दिव्यातील वात
तुझे हरवले शब्द
मी अलवार गतीने वेचतो
माझा हरवला भाव
कधी तुला अनाहूत सुचतो
मी नसतोही कधी बहुधा
तुझ्या ध्यानीमनी
तरीही कविता माझी
आपसुक चांदणखुणी
༄᭄प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
०४.०९. २०२२
तुझे चांदणे निळे
पाताळात बहरते
चंद्रोदयाचे तळे
दारात थबकते सांज
खिडकीला वारा शिवे
तमास माझ्या तुझे
प्रकाशकवडसे हवे
उदास दिव्यांच्या संगे
शब्दांना थरथर सुटते
दुर शिवारा तमोघडीला
हळवी भाषा फुटते
शब्दामागे निघतो
पेरत सांजगीताचे सुर
सजनखुणांचे ठसे
उमटत असता दुर
आभाळ ओंजळ भरते
न पसरता हात
कुर्बानीत जळताना
मंद दिव्यातील वात
तुझे हरवले शब्द
मी अलवार गतीने वेचतो
माझा हरवला भाव
कधी तुला अनाहूत सुचतो
मी नसतोही कधी बहुधा
तुझ्या ध्यानीमनी
तरीही कविता माझी
आपसुक चांदणखुणी
༄᭄प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
०४.०९. २०२२
No comments:
Post a Comment