मी वगळलेला तपशिल
मी निनावी लोकगीत
नदी गुमान वाहते जशी
अजाण सागरमिलनरित
मी सुटलेले अज्ञात
आठवता ना आठवे
मी काट्यात रूतलेले जणू
बहर फुलांचे ताटवे
मी हरवलेली चिज
कोणास नसे ना ठाव
व्याकुळ अभंगातला मी
दडलेला आर्त भाव
मी सोडलेले शहर
मी उगाच कोणी नाही
अंधारव्रतात उमटणारी
मी प्रकाशकवडसी ग्वाही
मी अंधूक, अधुरे,धुसर
स्वप्न न पडणारे
मी दिशाहीन थव्यातुन
पाखरू उडणारे
मी कोणीच कसा नाही?
ही न वाटणारी खंत
निरखुन न पाहिलेला
तरीही मी आसमंत
मी ध्यानीमनी नसणारा
जणू आठवणींचा डोह
मी अनावर व्याकुळातला
अल्प मिलनमोह
मी अलक्षी गर्दी
मी विसरलेला चेहरा
मी भुगर्भस्त दडवलेली
मातीआडची मोहरा
मी न जुळलेले काव्य
मी न भेटला शब्द
तुझ्या सुटल्या कवितेचे
मी अव्यक्त प्रारब्ध!!
༄᭄प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
०४.०९. २०२२
मी निनावी लोकगीत
नदी गुमान वाहते जशी
अजाण सागरमिलनरित
मी सुटलेले अज्ञात
आठवता ना आठवे
मी काट्यात रूतलेले जणू
बहर फुलांचे ताटवे
मी हरवलेली चिज
कोणास नसे ना ठाव
व्याकुळ अभंगातला मी
दडलेला आर्त भाव
मी सोडलेले शहर
मी उगाच कोणी नाही
अंधारव्रतात उमटणारी
मी प्रकाशकवडसी ग्वाही
मी अंधूक, अधुरे,धुसर
स्वप्न न पडणारे
मी दिशाहीन थव्यातुन
पाखरू उडणारे
मी कोणीच कसा नाही?
ही न वाटणारी खंत
निरखुन न पाहिलेला
तरीही मी आसमंत
मी ध्यानीमनी नसणारा
जणू आठवणींचा डोह
मी अनावर व्याकुळातला
अल्प मिलनमोह
मी अलक्षी गर्दी
मी विसरलेला चेहरा
मी भुगर्भस्त दडवलेली
मातीआडची मोहरा
मी न जुळलेले काव्य
मी न भेटला शब्द
तुझ्या सुटल्या कवितेचे
मी अव्यक्त प्रारब्ध!!
༄᭄प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
०४.०९. २०२२

No comments:
Post a Comment