Saturday, September 17, 2022

मौन...



फकिर म्हणाला.......
चुप क्यूँ हो?
क्या रंज खलता है?
ये बेलफ्ज रहेना भी
कितनी जोर से बोलता है।

मी : या मौनात दडले आहे
लक्ष शब्दांचे हरणे
गझलांनी माझ्या रातव्यात
स्वप्नबंबाळ होऊन मरणे

मी शब्द कशाला योजू?
ती टिपत असता भाव
माझ्या आकांती गझलाना
मी दिले मौनाचे नाव

कळते तिला अवघे
जरी असते मुके सारे
सांगतात खबरबात सारी
दोघांस पाहणारे तारे....

फकिर: अच्छा........?
सितारे है जरिया?
मी : बाबा ! बहती लहरो का ही
खामोश रहेता है दरिया ।

फकिर : बनो !
और गहरे बनो ।
खुद के अंदर की लहरो की
विरानिया सुनो ।
मी : हं......

मी गाठतो आहे तळ
माझ्याच गर्ततेचा
आधार असा तरंगाया
मला सापडत नाही.......

༄᭄प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१७.०९. २०२२






No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...