Friday, September 16, 2022

व्याकुळ आण !


शोधता किती शोधू
हे अंतरीचे कोडे?
दे ना ओळखखुणांचे
आभास मनाला थोडे

असली रित कसली
मीच शोध घ्यावा?
की हरवून तुझ्याअंतरी
तुझाच शोध व्हावा?

येता काळीजहाक
उडेल निद्रेचा थवा
नजरेतल्या स्वप्नांचा
मग तारकात गवगवा

खिळता चंद्रावर नजर
दाटून येईल रान
मग राखत तु जागी
माझी व्याकुळ आण!



༄᭄प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१७.०९. २०२२









No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...