शोधू?
मिटवशील अंतर?
की राहू असाच एकला
अज्ञात..समांतर..?
येवू?
की असाच दुर राहू?
की मध्यरातीच्या घडी
नयनातुन तुझ्या वाहू?
राहू?
तुझ्या अंतरी खोल
होवू दे ना थोडे तुझे
हृदय ही अनमोल...
पाहू?
बंद डोळ्यातले किस्से?
की वाटून घेवू तगमगीचे
हुरहुर दाटके हिस्से?
थांबू?
न पडत्या स्वप्न वेळी
की पेरू चंद्र पुर्ण
आसुस उत्सुक भाळी?
निघू?
नको! हलकेच मला तु थांबव
हा क्षण आभासी मखमली
अजून थोडासा लांबव.....
༄᭄प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१७.०९. २०२२
मिटवशील अंतर?
की राहू असाच एकला
अज्ञात..समांतर..?
येवू?
की असाच दुर राहू?
की मध्यरातीच्या घडी
नयनातुन तुझ्या वाहू?
राहू?
तुझ्या अंतरी खोल
होवू दे ना थोडे तुझे
हृदय ही अनमोल...
पाहू?
बंद डोळ्यातले किस्से?
की वाटून घेवू तगमगीचे
हुरहुर दाटके हिस्से?
थांबू?
न पडत्या स्वप्न वेळी
की पेरू चंद्र पुर्ण
आसुस उत्सुक भाळी?
निघू?
नको! हलकेच मला तु थांबव
हा क्षण आभासी मखमली
अजून थोडासा लांबव.....
༄᭄प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१७.०९. २०२२
No comments:
Post a Comment