Saturday, September 24, 2022

सहमुक्ती....

व्याकुळ व्हायचे नाही म्हणून
मी गाठतो आहे तळ
जिथे तुझी हाकही
पोचणार नाही

हे अंधारे रस्ते तुडवत
मी ओलांडले आहे
निनावी बनून
सप्तपाताळ...

या एकाकी अंधारास
सरावत माझे डोळे
शोधताहेत मिट्ट
काळोखाचा कोपरा

या निशब्द मुहूर्तावर
मी स्थिरावलो आहे
अशा जागी जिथे
मी मलाच दिसू शकत नाही

तुझ्या वियोगाचे आलाप
त्यागायच्या इच्छेने
मी पापण्या बंद करून
मोजतो आहे माझे श्वास

आणी समाधिच्या
पहिल्याच पायरीवर उभे राहून
तु बोलावते आहेस हसत
एक हात पुढे करून....

मी तुला सोबत
घेवूनच
आता होऊ पाहतो आहे
मुक्त.....!!

༄᭄प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२४.०९. २०२२




No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...