Friday, October 7, 2022

तमशलाकेत....



या उजेडभासी राती
तळे निजत नाही
ही कसली धुनी अंतरी
विझता विझत नाही

या तमशलाकेत रूतते
चांदण्याची हाक
चंद्रास ही बिलोरी
तुझ्या नयनाची झाक

अवगुंठते वा-याची
वाहण्याची भाषा
अंधारावर तुझ्या
ओढ आभाळाची रेषा

रेषेच्या रोखाने
गाठ तु टिंब
तळाशी साचलेले
पुर्ण चंद्राचे बिंब

सारे सारे तपशील
देती तुला हाक
कवितेला माझ्या
तुझ्या चांदण्याची झाक

उभे कशासाठी कोण?
देत उजेडाचे दान
माझ्या शब्दांना पुकरते
तुझी मुक मुक आण

प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
७.१०. २०२२










No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...