माझ्या शब्दावर तुझे
आभाळ उतरून टाक
कवितेला येईल मग
तुझी धुसर झाक
शब्दांची धरपकड कर
त्यातले अर्थ शोध
होईल तुला गर्त मग
व्याकुळ अर्थबोध
निशीगंधासम मोहोर
पुन्हा बहरून ये
माझ्या गावाच्या कवितेत
मनसोक्त विहरून ये
राती निजेस जाता
कवितेने कुशी उजव
माझ्या शब्दांना मग
ओल्या आठवांत भिजव
शब्दांचे पोत तपास
पाहूनही घे जडण
हाती तो तो लागत जाईल
तुला तुझीच घडण
नि:श्वास,हुंदक्याने
सिंचीत रहा हे रान
माझी कविता बहरेल
तुला अर्पित आत्मभान...
प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
८.१०. २०२२
आभाळ उतरून टाक
कवितेला येईल मग
तुझी धुसर झाक
शब्दांची धरपकड कर
त्यातले अर्थ शोध
होईल तुला गर्त मग
व्याकुळ अर्थबोध
निशीगंधासम मोहोर
पुन्हा बहरून ये
माझ्या गावाच्या कवितेत
मनसोक्त विहरून ये
राती निजेस जाता
कवितेने कुशी उजव
माझ्या शब्दांना मग
ओल्या आठवांत भिजव
शब्दांचे पोत तपास
पाहूनही घे जडण
हाती तो तो लागत जाईल
तुला तुझीच घडण
नि:श्वास,हुंदक्याने
सिंचीत रहा हे रान
माझी कविता बहरेल
तुला अर्पित आत्मभान...
प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
८.१०. २०२२
No comments:
Post a Comment