Friday, October 7, 2022

रेषा...


सायंतारा सांजवेळी
शोधतो नभात 'ओरवा'
मनात भरून येतो
आठवणींचा मारवा

तु मी जरी मिसळलो
नभात उमटते रेषा
दिवसात मिसळण्यापासून
वंचीत राहते निशा

सांजेचा धुसर पुल
एकमेव आपले सांधण
शब्दात माझ्या उतरते
तुझे नक्षी गोंदण

ओलांडावा कसा
या परिघाचा फेरा?
धरतीस कसा बिलगावा
दुर नभीचा तारा?

जळतो दिवा तरीही
अंधार साचून येतो
हा बाण कसा जिव्हारी
हलकेच टोचून जातो

मी राखतो तरीही
तु आखली लक्ष्मणरेषा
आस पाठवून देतो
तु नसल्या दुरदेशा....


प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
८.१०. २०२२












No comments:

Post a Comment

अत्त दिप भव!

शाक्यमूनी तथागता! वैशाख पोर्णिमेस तू पद्मफूलावर पाय देत अवतरलास ! मात्र ! बूध्दत्व साधण्यासाठी तू धुंडाळलेस कितीतरी काटेरी मार्ग! निकराने नि...