Sunday, October 23, 2022

मुक दुवा..




चिमणी येते
माळ हसतो
रान फुलावर
रंग दिसतो

हितगुज होते
बहर फुलतो
पंख रंगात
माळ झुलतो

संगत होते
मन जडते
चिमणीचे सख्य
माळाशी जडते

अचानक चिमणी
उडून थवा होते
माळावरची मातीही
मग मुक दुवा होते......

प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२४.१०. २०२२







रचनापर्व

Wednesday, October 19, 2022

नकोस....


मी धुसर होऊन असा
गडदाऊ कसे रंग?
ढगास कुठल्या देवू
परतोन्मुख तरंग?

डोंगराची एकट माळ
गाईल गीत कसले?
स्वप्न तुझे शिखराचे येथे
उशास माझ्या बसले

बुडणा-या किरणांचे
कसे गाठू मी मुळ?
की उधळू अवकाशी
थव्यापंखातली धुळ

उजेड हृदयाचा देऊ
की होऊ तमाची छाया?
नकोस पाठवू स्वतःतल्या
स्वतःस मला भेटाया....

प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२०.१०. २०२२






Sunday, October 16, 2022

बहराचा जोगी

अस्तचलाकडे बहर
निघता निःसंकोची
दुःख पाझरते मुक
फुलखुडीच्या जागी

गवत मुळातुन
पुन्हा बहरतो
वसंतवैभवाचा
रंगीत जोगी.....

प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१६.१०. २०२२



Friday, October 14, 2022

पाऊस परतीचा


नसतो कधी कधी
पाऊस सखा धरतीचा
मग ढगास होणे होते
पाऊस परतीचा.....

देवून सारे निघतो
नसते कसली घाई
धरती अनूभवताना
नवॠतुची हिरवाई

दरवेळी असाच तो
उसासून सारे देतो
हंगामाच्या शेवटी
तो परका परका होतो

गुमान जातो निर्वाती
पायरव न करता
क्लांत निरभ्र होतो
धरतीची ओटी भरता

येईल हाक फिरूनी
पुढच्या ॠतुच्या घडी
तो पावेतो पाऊस माझा
देईल काळीज दडी

झालाच जिव उष्म
माग कधी तु धारा
मी होईन तुजसाठी
पाऊस बरसणारा........

प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१५.१०. २०२२




Tuesday, October 11, 2022

बहर वरदान


तुझ्या शहरावर धुके येते
झाकाळली संध्या होते
ढगांना अजाण हुरूप येतो
कुंद फुलवेलींना बहराची
फुलमिठी पडल्याने
कदाचित मोरही
जंगलकपारीत
दगडफुलावर
पेरत असतील गाणे
आणी रिमझिम थेंबाच्या
मृदू स्पर्शात उमटले मोहोर..
माती उधळतही असेल
रानावनावर...
पण दुर खोल जंगलात
एखादी देवबाभुळ
हळदकणातुन उत्सुक असेल
अंधारल्या ढगास
स्वर्णकण बहालीस...
कधी वळतील का तुझे पाय
जंगलवाटा तुडवत?
खोल जंगलातील
झाडांनाही असते बरं
बहराचं वरदान!

प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१२.१०. २०२२

Monday, October 10, 2022

सुरेल गीत

बेहिसाब आठवणीस
विसरण्याची असेल का
एखादी रस्म?
हृदयात ही कंपने
स्थिरावत
कुठला ख्यालाची
लोकगीते म्हणू मी ?
एकाकीच कसा पार
पाडू मी हा
आदिम यातुविधी?
ध्वनीत एकात्म
होण्यासाठी
मी विस्कळून
टाकतो आहे
सप्तसुर..
                        आणी हे एक⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀
फुलपाखरू
कुठुन तरीही
घेवून येत आहे
सुरेल गीत?
🦋˙˜”*°•.
༊प्रतापॱ⋅.˳˳.⋅ਏਓ ઇଓ
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
३.१०. २०२२



Sunday, October 9, 2022

चंद्रज्योती



चंद्र आला सखे!
उजळत तुझी काया
अंथरली मी ओंजळ
आभा तुझी धाराया

उजळ चंद्रज्योतीतुन
मोतीपवळ्याच्या राशी
तुळसमंजिरी हसते
दिवेलागणी दाराशी

ये! सारेच उजळत असे
तम सोनधुके भासावा
चकोर व्याकुळ होवून
चेह-यास तुझ्या ध्यासावा

शुभ्रधवल ढगाला
जसे लाभले सोने
उजळून दे समग्र
जगण्याचे गडद कोने....

प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
९.१०. २०२२




Friday, October 7, 2022

रेषा...


सायंतारा सांजवेळी
शोधतो नभात 'ओरवा'
मनात भरून येतो
आठवणींचा मारवा

तु मी जरी मिसळलो
नभात उमटते रेषा
दिवसात मिसळण्यापासून
वंचीत राहते निशा

सांजेचा धुसर पुल
एकमेव आपले सांधण
शब्दात माझ्या उतरते
तुझे नक्षी गोंदण

ओलांडावा कसा
या परिघाचा फेरा?
धरतीस कसा बिलगावा
दुर नभीचा तारा?

जळतो दिवा तरीही
अंधार साचून येतो
हा बाण कसा जिव्हारी
हलकेच टोचून जातो

मी राखतो तरीही
तु आखली लक्ष्मणरेषा
आस पाठवून देतो
तु नसल्या दुरदेशा....


प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
८.१०. २०२२












आत्मभानाचे अर्पण


माझ्या शब्दावर तुझे
आभाळ उतरून टाक
कवितेला येईल मग
तुझी धुसर झाक

शब्दांची धरपकड कर
त्यातले अर्थ शोध
होईल तुला गर्त मग
व्याकुळ अर्थबोध

निशीगंधासम मोहोर
पुन्हा बहरून ये
माझ्या गावाच्या कवितेत
मनसोक्त विहरून ये

राती निजेस जाता
कवितेने कुशी उजव
माझ्या शब्दांना मग
ओल्या आठवांत भिजव

शब्दांचे पोत तपास
पाहूनही घे जडण
हाती तो तो लागत जाईल
तुला तुझीच घडण

नि:श्वास,हुंदक्याने
सिंचीत रहा हे रान
माझी कविता बहरेल
तुला अर्पित आत्मभान...

प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
८.१०. २०२२












तमशलाकेत....



या उजेडभासी राती
तळे निजत नाही
ही कसली धुनी अंतरी
विझता विझत नाही

या तमशलाकेत रूतते
चांदण्याची हाक
चंद्रास ही बिलोरी
तुझ्या नयनाची झाक

अवगुंठते वा-याची
वाहण्याची भाषा
अंधारावर तुझ्या
ओढ आभाळाची रेषा

रेषेच्या रोखाने
गाठ तु टिंब
तळाशी साचलेले
पुर्ण चंद्राचे बिंब

सारे सारे तपशील
देती तुला हाक
कवितेला माझ्या
तुझ्या चांदण्याची झाक

उभे कशासाठी कोण?
देत उजेडाचे दान
माझ्या शब्दांना पुकरते
तुझी मुक मुक आण

प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
७.१०. २०२२










Wednesday, October 5, 2022

हिरवे उधाण


माझ्या गगन हाकेवर
उधाण हिरवे येते
शिळ अंतरीची
मग चंद्र चांदणे होते

एक सुबक तारा
हसतो सांडत आभा
हृदयात साठवणुकीची
देत नाजुक मुभा

मन पिसारा होते
सजवत आपली काया
हिरव्या ढगात उमलते
गुलाबी चांदणमाया

नजरेत चमकतो चंद्र
स्मितात मधुच्या धारा
आभास कुशीत मोहरतो
पाहून हसरा तारा....


༄᭄प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
५.१०. २०२२




जळण्याचे तिलीस्म



कुठल्या परगण्यात
कुठल्या गावा
शोध कसा हा
पुर्ण व्हावा

ह्या फुलाचा असा
कुठला आहे वाण
ॠतु येण्या जाण्याचे
याला न राही भान

चालता अंतर सरते
पाऊल निघत नाही
ही कसली भुल पापण्याला
सहजी बघत नाही

मी विसरत नाही वार
हंगामाचे तुझ्या ओले
ऐन फुलघडीचे माझे
कित्येक बहर गेले

येवून जातो वणवा
सहजी शमत नाही
छंद अरण्यास माझ्या
त्यालाही गमत नाही

ये धडाडून व्यापत
करत सारे भस्म
कळेल तुलाही सुख
अन् जळण्याचे तिलीस्म.....

༄᭄प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
५.१०. २०२२








काट्याचे दुःख


बाभळीच्या काट्याला
काय असेल टोचत?
टोचण्याचे दुःख कसे?
ही व्यथा असेल जाचत

वेदनेच्या कळवळ्याला
तो अभागी वंचित
दुःख अनावर त्याचे
कसले त्याचे संचित...

༄᭄प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
५.१०. २०२२





Sunday, October 2, 2022

स्पंदनभुल


सांज अवतरे मृगजळी
थवा घरट्याचा तृष्ण
अशा शामली वेळी
बासरीतुन निवतो कृष्ण

अवकाशी लाली पसरे
आरक्त गोकुळ होतो
गायगळ्याची घंटा
उत्सुक पायरव होतो

निरंजनाचे हृदय
जळून वात उजळते
आभाळावर रवीचे
मन सांय ढवळते

अशा अवघड वेळी
आठवे चांदणझुल
हृदयास माझ्या पडावी
तुझी स्पंदनभुल....

༄᭄प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२.१०. २०२२





Saturday, October 1, 2022

तृष्णमुरारी


ये असा अंतरी माझ्या
जणू शेवटली पाउस सर
ओल्या ओल्या गहिवराला
कंचओले पुन्हा कर

धारून घेवू दोघेही
धरतीचा तृष्णमुरारी
रूजवून प्रित अंतरी
घेवू ढग भरारी

ध्यानीमनी नसता
तो अनाहूत दारी पडतो
अशा ओल्या प्रितीचा
प्रसंग क्वचित घडतो

मी नाही धाडत मेघदूत
अंतरात्मा माझा सांडतो
माझ्या काळजाचे ओले पाऊस
तुझ्या छतावर मांडतो.....

༄᭄प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१.१०. २०२२









आठवांचे खडाव


गोरजधुळ आसमंती
भेटीचे पाझर ओले
गोठ्यांचे काळीज पान्हा
बासरीचे सुर निघाले

एकांत ग्रहणावेळी
हलकीशी चाहूल भिडते
गोठ्यामागे कोणी
मुक राधा रडते

आठवांचे खडावांना
पाऊल कुणाचे देवू?
हंबरलेल्या हृदयाला
चाहूल कुणाची वाहू?

फुलव संध्यासमयी
माझ्या अंकुराचे पोत
एकल्या जिवास भेटते
तुझ्या आठवांचे गणगोत

मी अंधाराच्या खाली जपतो
चंद्रमुखी फुलांचे ताटवे
या घनघोर एकांत वेळी
चंद्र तुझा बघ आठवे

नकोस देवू अमावस
सोनेरी पुनव राती
तुझ्या प्रकाशबिजासाठी
उत्सुक असता माती....

༄᭄प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१.१०. २०२२







राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...