अश्रुथेंबाच्या तळात
मी ढवळतो आहे
एक दुःख अपार
वाहून वाहून
ते संपावे म्हणून...
पण काय माहित
कसे?
हे भूगर्भातील झरे
आटता आटत नाहीत
बहुधा असतात का
काही दुःखे
पाणीदार.......?
("やraτa প")
www.prataprachana.blogspot.com
१०.९.२०२३
No comments:
Post a Comment