निळ्या नभाच्या खाली
मिटून आपले डोळे
शुभ्र धुक्यावर उमलून येती
आभासरंगी सोहळे
एक ढग तो बहुरंगी
जणू जळाची धारा
व्यापून स्पर्श करतो
सुक्ष्म थरथरणारा
जोग घेतली झाडे
त्यांना जांभळी झाक
वारा टिपून आणतो
एक मुकी का हाक
मी चंद्र पेरा करतो
माळाचे काळीज हालते
कोण सखे गं तुजला
घनव्याकुळ मुक बोलते
पाणवठ्यावर होती
आभासाशी डोळाभेटी
काळोख उधळून भरतो
चांदण्याने तुझी ओटी
दे चांदण्याचे हात
या आभाळगोंदी हाती
उजवून देईल वारा
एकांतास सद्गती!
("やraτa প")
www.prataprachana.blogspot.com
१७.९.२०२३
No comments:
Post a Comment