चांदण्याचे झुंबर
कोण हुरहुर पेरे
कुठुन हाक आणते
अज्ञात ओले वारे
दूरचा एक तारा
का राहतो जागे जागे?
न तुटता तू त्यास का
निशिगंधी दान मागे?
या शिशिरतमास फुटते
स्वप्नांची स्फटिक छाया
दे हात असा अधिर तु
चांदणे उतराया
शिलगू दे चांदण्याच्या
काळजात तुझे रंग
होऊ दे रातीस या
व्याकुळ एक अभंग
("やraτa প")
www.prataprachana.blogspot.com
१६.९.२०२३
No comments:
Post a Comment