खुल्या खिडकीत असे
निश्चल कोण ऊभे?
कसले व्याकुळ निग्रह
कसले आर्त मनसुबे?
दुर जाती वाट का
फिरुन माघारा येते?
निग्रहाचे अस्तर कठोर
हलका पाचोळा होते?
काही हाती नाही
ना असती हात रिते
ठार निःशब्द मौनास
का सुचती तुझी गीते?
("やraτa প")
www.prataprachana.blogspot.com
१६.९.२०२३

No comments:
Post a Comment