या सुर्यमुखी हाकांना
गुलमोहरी फुलांचे तुरे
का अखंड वाहती मनी
तुझे आभासी झरे?
समाधिस्थ मुळांचे झाड
त्यास बहर केशरवर्णी
फांद्या फुलास त्याच्या
अज्ञात पाखर झुरणी
सडे फुलांचे अवनी
केशर माती झोपले
मावळतीचे रंग बिलोरी
संध्या मिठीत लोपले
घनगर्द आतुर वेळी
तु वाट कुणाची पाहे?
वाणीस त्या आभासाने
फुटती व्याकुळ दोहे
त्या दोह्याची शब्दे
झाडाचे मुळ होते
मन माझे घनव्याकुळ
आठवांचे कुळ होते
("やraτa প")
www.prataprachana.blogspot.com
१९.९.२०२३
No comments:
Post a Comment