बकुळफुलांच्या राईचे
कसले हे गवगवे
झाडांच्या फांदिवरती
साजन गंधी थवे
स्मरणात का खुलते
बंद कळ्यांची फांदी
एकांताच्या झुळकीला
सहवासाची नांदी
हे झाड किती युगाचे
हर बहरी व्याकुळ झिजले
त्याच्या मुळतळाशी
कितीक स्वप्ने निजले
तु भाव सुरंगी छेडता
स्वप्नांचा बकुळ होतो
साजन दुर देशीचा
घनघोर व्याकुळ होतो
("やraτa প")
www.prataprachana.blogspot.com
१७.९.२०२३

No comments:
Post a Comment