सखे! बहर अनोखे भाव
पाखरे असे का फिरती?
भास तुझे आसमानी
भवताली भिरभिरती
मी काय शोधत फिरतो?
मलाच नसते ठावे
का मजला हुरूपून देती
तुझ्या गावचे रावे ?
आणती कसले संदर्भ ?
अंधुक गतकाळाचे
काळीज हुरहूर करते
मजसंग या माळाचे.....
("やraτa প")
www.prataprachana.blogspot.com
२८.९.२०२३
No comments:
Post a Comment