Thursday, September 14, 2023

झोळीला पाप


जहरीले काटे कशास
तु भुलीचे फुल दे!
भरल्या सायंकाळी
चकव्याची एक हुल दे!

जखमा कशास देते?
एक हलका वळ दे !
हस-या चेह-यामधूनी
जीवघेणी तु कळ दे!

दुर कशास लोटते?
जाण्यासाठी वाट दे!
रेतरेखले नाव मिटण्या
हलकी एक लाट दे!

कशास करु प्रतिक्षा?
ठार काळी रात दे!
इवल्याशा चंद्रकोरीवर
गर्द ढगाने मात दे!

नकोस करु बंद
वेशीत मौनाचे वार दे!
कर हाकेची कत्तल
मग दुराव्यास धार दे!


कशास शब्द टाळते 
कवितेला या शाप दे!
पुण्य तुझ्या पदरा
या झोळीला पाप दे!

                          ("やraτa প")                           
www.prataprachana.blogspot.com
१४.९.२०२३ 





 
 


No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...