Thursday, September 14, 2023

कविता पुसणे



न सुचल्या कवितेसाठी
मी राखला आहे अवकाश
या अनामिक हुरहुरवेळी
तु स्फुरूण ये सावकाश...

शब्द शब्द आकार घे;
जणू उल्का अवनी गाठे
कवितेच्या रुणझुण पाण्याचे
उजवत गर्भस्त साठे

वाहू दे रुधिरे मधूनी
माझ्या आकांत लाटा
एकांताच्या घनराईला
फुटू दे पाऊल वाटा

त्या वाटेने येवून
तु दे वणव्याचे दान  
संथ निशाकाळास या
एकट ज्वाळेचे वरदान

हसते आहे जंगल
विक्राळ तुझे नसणे
अनंत कविता लिहणे
आणी अलवार त्या पुसणे......

              ("やraτa প")                          
www.prataprachana.blogspot.com
             १४.९.२०२३

No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...