आभाळ रिते व्हावे
इंद्रधनुस मिळावे रंग
मातीच्या अंतःकरणी
साचावा एक अभंग
गवताने सांभाळावे
पाण्याचे रंगीत मोती
बहरून यावी हिरवी
ओली झाली माती
चिखलाने चुंबुन घ्यावा
तळव्याचा हळवा माथा
रूतत्या पाऊल ठशांनी
रेखावी मिलन गाथा
रस्त्याने निथळुन घ्यावी
थेंबाची उधळण ओली
कंठास पावश्याच्या
बिलगावी भिजकी बोली
मी पान ओले पलटावे
थेंबाचे शब्द झरती
हृदयी साचल्या रंगाचे
इंद्रधनु चमके वरती
आभाळ रंगीत करून
मी लिहतो नभाचे गाणे
झाडास बिलगून घेती
ओली झाली पाने...
दुर भिजला गाव
पंख फडकवून निघी
पावसाच्या हंगामाला
ओल्या थेंबाची सुगी
तुषार निवळत असता
ओल हृदयी दाटते
इंद्रधनुच्या आडून तु
सजून यावे वाटते
दिसत असतील तुलाही
रंग आभाळी पेरलेले
मिळतील का थेंब परत?
तुझ्या रानावर झरलेले
निघून जातील रंग
अवकाश होईल सुना
मी शोधून घेईन नयनी
तुझ्या इंद्रधनुच्या खुणा.....
Pr@t@p
" रचनापर्व "
10/8/2020
BLOG#prataprachana.blogspot.com
साचावा एक अभंग
गवताने सांभाळावे
पाण्याचे रंगीत मोती
बहरून यावी हिरवी
ओली झाली माती
चिखलाने चुंबुन घ्यावा
तळव्याचा हळवा माथा
रूतत्या पाऊल ठशांनी
रेखावी मिलन गाथा
रस्त्याने निथळुन घ्यावी
थेंबाची उधळण ओली
कंठास पावश्याच्या
बिलगावी भिजकी बोली
मी पान ओले पलटावे
थेंबाचे शब्द झरती
हृदयी साचल्या रंगाचे
इंद्रधनु चमके वरती
आभाळ रंगीत करून
मी लिहतो नभाचे गाणे
झाडास बिलगून घेती
ओली झाली पाने...
दुर भिजला गाव
पंख फडकवून निघी
पावसाच्या हंगामाला
ओल्या थेंबाची सुगी
तुषार निवळत असता
ओल हृदयी दाटते
इंद्रधनुच्या आडून तु
सजून यावे वाटते
दिसत असतील तुलाही
रंग आभाळी पेरलेले
मिळतील का थेंब परत?
तुझ्या रानावर झरलेले
निघून जातील रंग
अवकाश होईल सुना
मी शोधून घेईन नयनी
तुझ्या इंद्रधनुच्या खुणा.....
Pr@t@p
" रचनापर्व "
10/8/2020
BLOG#prataprachana.blogspot.com
No comments:
Post a Comment