स्वप्नांनांच्या सिमेरेषेवर
इंद्रधनु पेरणा-या सरी
उधाण दिसे त्यात
हवा मंद मंद जरी
हे हिरवळीचे प्राक्तन
माळास ओली हाक
गवताच्या काळजाला
पावलांचा धाक
संधेच्या किरणअंती
प्रकाश कसला उरतो
विरहात जणू रातीच्या
सुर्य सांज होवून झुरतो
हिरवळीस हाकेचे
कसले लागते फुल?
माळरानास पडते
ओल्या वाटेची भुल
पाऊस हलका पडतो
ओल पसरत जाते
वाट माळरानाची
पावलांना विसरत असते
खिडकी मनात घेते
न उघडण्याची आण
माळ टाकतो पदरात
नेमके प्रतिज्ञाभंगाचे दान
हे सुक्त कसले झरते
गाव ओला का दिसतो?
अर्धमिटल्या खिडकीत
दिवा थरथरत असतो
भटकत राही इंद्रधनु
माळाचे दगड रंगीत
वाट ऐकत असते
अस्वस्थ पैंजणी संगीत
पावलांना वाट फुटते
खिडकी विकल होते
माळाच्या इंद्रधनुचे
स्वप्न सफल होते
माळ हसत असतो
गाव मागे राहतो
इंद्रधनु रंगाचा पाऊस
माळरानावर वाहतो
Pr@t@p
" रचनापर्व "
21/8/2020
BLOG#prataprachana.blogspot.com
इंद्रधनु पेरणा-या सरी
उधाण दिसे त्यात
हवा मंद मंद जरी
हे हिरवळीचे प्राक्तन
माळास ओली हाक
गवताच्या काळजाला
पावलांचा धाक
संधेच्या किरणअंती
प्रकाश कसला उरतो
विरहात जणू रातीच्या
सुर्य सांज होवून झुरतो
हिरवळीस हाकेचे
कसले लागते फुल?
माळरानास पडते
ओल्या वाटेची भुल
पाऊस हलका पडतो
ओल पसरत जाते
वाट माळरानाची
पावलांना विसरत असते
खिडकी मनात घेते
न उघडण्याची आण
माळ टाकतो पदरात
नेमके प्रतिज्ञाभंगाचे दान
हे सुक्त कसले झरते
गाव ओला का दिसतो?
अर्धमिटल्या खिडकीत
दिवा थरथरत असतो
भटकत राही इंद्रधनु
माळाचे दगड रंगीत
वाट ऐकत असते
अस्वस्थ पैंजणी संगीत
पावलांना वाट फुटते
खिडकी विकल होते
माळाच्या इंद्रधनुचे
स्वप्न सफल होते
माळ हसत असतो
गाव मागे राहतो
इंद्रधनु रंगाचा पाऊस
माळरानावर वाहतो
Pr@t@p
" रचनापर्व "
21/8/2020
BLOG#prataprachana.blogspot.com
No comments:
Post a Comment