दुव्याच्या सावलीत
चांदणे निश्चल उभेचंद्राच्या मनात कसले
सारंगी मनसुबे?
धुके रातीस व्यापी
आभासाचे दिवे
दिर्घ एकाकी क्षणी
स्वप्नांचे थवे
मेहंदी ठशांचे
रातहळवे खुलून येणे
मी टिपून घेतो शब्दांने
रातराणीचे फुलते गाणे
झोपेच्या काठावरूनी
येती व्याकुळ हाका
सादभरला वारा वाही
चांद एकला मुका
रातीच्या चांदण्याला
सोन्याचा चंद्र पाही
श्वासांच्या चंद्रलयीला
रातराणी आत्मा वाही
गंधभारल्या दिशा
स्पर्शाची भाषा समजे
तळव्याच्या उत्कटतेला
गीत मनाचे उमजे
भासाच्या खिडकीतुन
चांद बावरा जाई
रातीच्या काळीज खुणांना
बिलगे पुसट शाई
बहरमुहूर्ती घडी
रातराणीचा गंध पसरतो
काल पडला सडा
पाय कुणाचा विसरतो?
मी चंद्रसुराची बासरी
वृदांवनात फेकून देतो
गोंदणाचा चंद्र पुसट
ढगात झोकून देतो....
Pr@t@p
" रचनापर्व "
15/8/2020
BLOG#prataprachana.blogspot.com
No comments:
Post a Comment