Sunday, August 23, 2020

गझलांचे स्पंदन....

मी राखत जंगल राहतो, तु वणवा पेटवत जा
भिजल्या पंखाना पारव्याच्या, निखारे भेटवत जा

आभाळाला रंगवून , कशास आणावे इंद्रधनु
तु ढग आणून काळे अवकाशी, आभाळाला नटवत जा

मी लाटा उधाणाव्या , बनून संदल दर्या
तु देवून अलांघी किनारे, लाटांना तटवत जा

पाखरांचे काय दोष?, फांदीवर क्षणभर बसती
तु जखमा दे करवतीच्या, फांद्याना तुटवत जा

मी बांधत राहतो चंद्रगाठी , घेवून उधार चांदणे
तु पेरून अंधार अमावसेचा , गाठी सुटवत जा

मनाच्या दौलतीचे , नजराणे पेश केले
जतन ठेवला ऐवज , तु परक्यावर लुटवत जा

मी लिहतो गझला सुफियानी, दुव्याचा अर्क असणा-या
तु दर्ग्याच्या भिंतीला, झुकला माथा टेकवत जा

शब्दांच्या शरांचे , होतील असाह्य वार
तु वाचुन मुक्याने गझला,नशीब शब्दांचे फुटवत जा

नाहीच जमले येणे, कशास मलूल व्हावे?
मनाच्या छपरावरील अडगळ, तु सवयीने हटवत जा....

झालेच अनावर अश्रु, नयनांची होईल नदी
तु देवून निघण्याचा इतल्ला, पापण्यांना दटवत जा
Pr@t@p
" रचनापर्व "
24/8/2020
BLOG#prataprachana.blogspot.com












No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...