Monday, August 24, 2020

मयुरपंखी नाणे......

हे उंच एकले उभे
नक्षिदार चबुतरे
पाहती त्यास दुरून
जखमांचे वारस कबुतरे

मखमली पिसांना
पंखाचे कसले देणे
मी मुठीत घेवून फिरतो
मयुरपंखी नाणे

दुरवर दिसणारा
शिखराचा उन्नत माथा
सांगत असतो मुक्याने
एकटपंथी गाथा

हे दुर जाणे कसले
कसला हा दुरावा
रातीत विरघळत्या चंद्राचा
भरोसा का धरावा?

वाटेला फुटून यावीत
पावलांची फुले
किती करावे सदैव
आठवणींशी सुले?

खबर कशाला हवी
निघुन गेल्या हवेला
ज्या पावलांना भेटला
रस्ता नव नवेला

स्वधुंदीच्या अंमलाखाली
थवे सोडून गेले
फांद्यानी भुलावा सोस
जे पक्षी उडून गेले

बहर लुटत्या वा-याला
झाडाने द्यावे त्यागून
चांद जपावा बिलोरी
रातीने एकले जागुन

हवा धारून घ्यावी
पंखाना शाकारून द्यावे
झेपाऊन ऊंच गगनी
चांदणे हाकारून घ्यावे...
Pr@t@p
" रचनापर्व "
25/8/2020
BLOG#prataprachana.blogspot.com








No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...