Tuesday, August 11, 2020

स्वप्नांचे होते सोने....



 त्या झुळकी आजही

तशाच संदल वाहती

श्वासाच्या कुपीत 

सुगंध शिल्लक राहती

हा आसमंत असा
चांदण्याने अलवार सजला
चंद्राच्या तळहातावर
मी लिहीत जातो गझला

शब्दथव्यांची झुंड
अनंतमुखी उडते
चांदण्याची प्रित
चंद्र समयी जडते

या समयभुलीच्या हाका
व्याकुळ होतो साजन
आकाश उधळून देते
रत्नखड्यांचे रांजण

ओल्या चिखल तळ्यात
आभाळाची छाया
चांद पांघरून घेई
चांदण्याची स्फटिक काया

रात थेंबाचे स्पर्श
अंधार होई ओला
ढगात भिजून जाती
सप्तर्षीच्या माला

पावसाळी चांदणे
अर्धे अधिक भिजते
माळाचे हिरवे प्राक्तन
साऊलबनात सजते

खिडकीच्या काळजातुन
नजर शोधते तारा
खच ढगांचे आणतो
पाऊस वेडा वारा

ओले आभाळ गाते
चांदणआठवांचे गाणे
अनाहूत निजल्या डोळ्यात
स्वप्नांचे होते सोने....

Pr@t@p
" रचनापर्व "
11/8/2020
BLOG#prataprachana.blogspot.com












No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...