डोळ्यात कुणाच्या दव
कोण पुसावे ओले?
मुक जाहल्या शब्दांचे
मनही मुक जाहले
न जाणो आज
ओठात सारंगी गाणे
पाखरे शोधती पसा
जे देती रोज दाणे
ओथंबल्या सुरांचे कसले
हे गगनभेदी आलाप
निघुन गेल्या शब्दांशी
कवितेचा हो मिलाफ
मुक धरतीच्या छातीवर
नांगर चालतो नग्न
हिरवे पिकले कणीस
वाटते भुक मग्न
हे झाड तुझे अजब
त्याचे बहर कसले?
तोंड फिरवते मुसाफिरही
सावलीत त्याच्या बसले
शहराचे उत्खनन करून
मी शोधावा प्राचिन ठेवा
लेण्याच्या दगडाआडूनी
तथागत अलिंगुन घ्यावा
पापणीच्या अंधारतळात
सजे ओले चंद्रतळे
बोटांनी रेखली प्रतिमा
पहाट ता-यात जळे
सोडून द्यावेत अवकाशी
बंदिस्त झाले पक्षी
नाजुक साजुक सायंकाळी
बिलगावे वासरू वक्षी
मी तुला कुशिला घ्यावे
फुलांना लाजु द्यावे
मुरलीचे धुंद स्वर
काळजात वाजू द्यावे
तु ताडून घ्यावी माझ्या
नजरेची बिलगभाषा
मी हळुवार टिपून घ्यावी
तुझ्या बंद डोळ्यांची अभिलाषा....
○Pr@t@p○
" रचनापर्व "
10/9/2020
BLOG#prataprachana.blogspot.com
कोण पुसावे ओले?
मुक जाहल्या शब्दांचे
मनही मुक जाहले
न जाणो आज
ओठात सारंगी गाणे
पाखरे शोधती पसा
जे देती रोज दाणे
ओथंबल्या सुरांचे कसले
हे गगनभेदी आलाप
निघुन गेल्या शब्दांशी
कवितेचा हो मिलाफ
मुक धरतीच्या छातीवर
नांगर चालतो नग्न
हिरवे पिकले कणीस
वाटते भुक मग्न
हे झाड तुझे अजब
त्याचे बहर कसले?
तोंड फिरवते मुसाफिरही
सावलीत त्याच्या बसले
शहराचे उत्खनन करून
मी शोधावा प्राचिन ठेवा
लेण्याच्या दगडाआडूनी
तथागत अलिंगुन घ्यावा
पापणीच्या अंधारतळात
सजे ओले चंद्रतळे
बोटांनी रेखली प्रतिमा
पहाट ता-यात जळे
सोडून द्यावेत अवकाशी
बंदिस्त झाले पक्षी
नाजुक साजुक सायंकाळी
बिलगावे वासरू वक्षी
मी तुला कुशिला घ्यावे
फुलांना लाजु द्यावे
मुरलीचे धुंद स्वर
काळजात वाजू द्यावे
तु ताडून घ्यावी माझ्या
नजरेची बिलगभाषा
मी हळुवार टिपून घ्यावी
तुझ्या बंद डोळ्यांची अभिलाषा....
○Pr@t@p○
" रचनापर्व "
10/9/2020
BLOG#prataprachana.blogspot.com

No comments:
Post a Comment