रस्त्यातला चिखल सुकुन
असावी पायवाट रुळली
झरल्या थेंबाची ओल
मातीस खोल कळली
लहरत्या गवताचे निरोप
माळ वा-यास बोले
रित्या तुझ्या ओंजळीला
प्राजक्ताची फुले
मी दुव्याचे चांदणे
आभाळी तुझ्या पेरले
कोणाच्या बासरीने दुःख
पैंजणांचे हेरले?
थबकत्या सांजेला
रात कुशीत सजवते
कोणाची भरली ओटी
निज नयनी रूजवते?
डोंगरटेकडीच्या माथ्यावर
सांज घुटमळत राही
वेशीआतील घरटे
वाट कुणाची पाही?
हे आभाळास कसले
उजेडाचे मिळे दान?
शहारत्या बोटांना कंप...
वहीतले शुष्क पान
नदीपात्रातील पाणी
का भासे युगतृष्ण?
नदी बनते राधा
स्थिर सागर कृष्ण
तुझ्या पंखाची झडप
ही आठवणीची झेप
दर संध्याकाळी माझी
अवकाशाला खेप
तु निरंजनातुन सांडता
उजेड स्वर्णकांती
मी धारण करतो गाभा-यातील
निरव एकली शांती
हर संधेला मी असाच
स्वतःला भारत असतो
एकल माळरानावर
चांदणे पेरत असतो...
Pr@t@p
" रचनापर्व "
04/9/2020
BLOG#prataprachana.blogspot.com
असावी पायवाट रुळली
झरल्या थेंबाची ओल
मातीस खोल कळली
लहरत्या गवताचे निरोप
माळ वा-यास बोले
रित्या तुझ्या ओंजळीला
प्राजक्ताची फुले
मी दुव्याचे चांदणे
आभाळी तुझ्या पेरले
कोणाच्या बासरीने दुःख
पैंजणांचे हेरले?
थबकत्या सांजेला
रात कुशीत सजवते
कोणाची भरली ओटी
निज नयनी रूजवते?
डोंगरटेकडीच्या माथ्यावर
सांज घुटमळत राही
वेशीआतील घरटे
वाट कुणाची पाही?
हे आभाळास कसले
उजेडाचे मिळे दान?
शहारत्या बोटांना कंप...
वहीतले शुष्क पान
नदीपात्रातील पाणी
का भासे युगतृष्ण?
नदी बनते राधा
स्थिर सागर कृष्ण
तुझ्या पंखाची झडप
ही आठवणीची झेप
दर संध्याकाळी माझी
अवकाशाला खेप
तु निरंजनातुन सांडता
उजेड स्वर्णकांती
मी धारण करतो गाभा-यातील
निरव एकली शांती
हर संधेला मी असाच
स्वतःला भारत असतो
एकल माळरानावर
चांदणे पेरत असतो...
Pr@t@p
" रचनापर्व "
04/9/2020
BLOG#prataprachana.blogspot.com

No comments:
Post a Comment