Tuesday, September 8, 2020

हाकांचे कळप.....

सुगंधाचे सौदे करून
अत्तर मिरवता बहर
हाकांचे कळप तुडवती
पळसपेटता प्रहर...

कैफियत फुलांची
थबकत्या ओल नजरा
आठवणींचा माहेरवास
हो एकांत भरीस साजरा

सावल्यांच्या उजेडाच्या
पेटत्या चंद्रसमया
भगवे केशर नेसते
सांजेची धुसर किमया

बहराच्या आडोशाला
अंधार सजून घेतो
डोळ्यात दाटला लाव्हा
अवकाशी थिझून घेतो

राऊळाची घंटा दे
चर्चबेलेस इशारे
मोर झाकून घेतो
बहर तालांचे पिसारे

हे एकले झाड
युगाचा भार वाही
झडत्या बहराला दे
फांदीची ठाम ग्वाही

दरवर्षी फुले झडतात म्हणून
झाड फांदी गाळत नाही
पानझडीची संधी
चैत्र बहरण्या टाळत नाही

पाखरपंखी आभाळ
चांदण्यावर मोहून जाते
चंद्र सजले अंबर कोण
खिडकीतुन पाहून घेते?

आठवणींच्या डोळ्यात
आकाशगंगा पसरते
धरतीची काळीजमाया
रातीस वाट विसरते

मी दिवे पेटवून देतो
पाखरांना समजते दिशा
बहराच्या दिपस्तंभाला
कवटाळे चंद्रसजती निशा....
Pr@t@p
" रचनापर्व "
8/9/2020
BLOG#prataprachana.blogspot.com










No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...