हे अवगुंठलेल्या बहरा
माझी प्रतिक्षा थांबणार नाही
हा शुष्क पानझडीचा मोसम
लांबता लांबणार नाही
तु येशील घेवून
फुलांचे सुगंधी आत्मे
आणी गातील पाखरे
फुलण्याचे रंगीत महात्म्य
मी तुझे बहरने पाहीन
झाडांचे रंग वेचेल
कदाचित एखादी
नायाब गझलही सुचेल
तुझ्या उमलण्याच्या घटिका
फुलपाखराची मोहरती पंखजोडी
वाहत्या वा-याला लागेल
माझ्या माळरानाची एकट गोडी
आभाळ चमकत असेल
सुर्य भराला येईल
ढवळत येती सांज
कोकीळ सुरिली होईल
रस्ते गातील अंतःकरणातुन
येत्या पावलाचे गाणे
निळाशार आभाळाला
लागेल चांदण्याचे सोने
चंद्र उगवेल न उगवेल
उजेडाचा हिस्सा असेल
माझ्या कवितेत भिजला हरशब्द
मिलनाचा किस्सा असेल
आकाशगंगेच्या कोप-यावरून
कोणी मला पाहील
नयनाची चमक पाहून
अधिकच्या चांदण्या वाहिल
दिवस भारावले असतील
हवाही असेल धुंद
ओंजळीत रेंगाळेल माझ्या
तुझ्या चेह-याचा सुवास मंद
सारे असेल उजळलेले
चंद्र ही करेल लगबग
दोन घटिकेच्या शायरीला
नसेल शब्दांची तगमग.....!
Pr@t@p
" रचनापर्व "
6/9/2020
BLOG#prataprachana.blogspot.com
माझी प्रतिक्षा थांबणार नाही
हा शुष्क पानझडीचा मोसम
लांबता लांबणार नाही
तु येशील घेवून
फुलांचे सुगंधी आत्मे
आणी गातील पाखरे
फुलण्याचे रंगीत महात्म्य
मी तुझे बहरने पाहीन
झाडांचे रंग वेचेल
कदाचित एखादी
नायाब गझलही सुचेल
तुझ्या उमलण्याच्या घटिका
फुलपाखराची मोहरती पंखजोडी
वाहत्या वा-याला लागेल
माझ्या माळरानाची एकट गोडी
आभाळ चमकत असेल
सुर्य भराला येईल
ढवळत येती सांज
कोकीळ सुरिली होईल
रस्ते गातील अंतःकरणातुन
येत्या पावलाचे गाणे
निळाशार आभाळाला
लागेल चांदण्याचे सोने
चंद्र उगवेल न उगवेल
उजेडाचा हिस्सा असेल
माझ्या कवितेत भिजला हरशब्द
मिलनाचा किस्सा असेल
आकाशगंगेच्या कोप-यावरून
कोणी मला पाहील
नयनाची चमक पाहून
अधिकच्या चांदण्या वाहिल
दिवस भारावले असतील
हवाही असेल धुंद
ओंजळीत रेंगाळेल माझ्या
तुझ्या चेह-याचा सुवास मंद
सारे असेल उजळलेले
चंद्र ही करेल लगबग
दोन घटिकेच्या शायरीला
नसेल शब्दांची तगमग.....!
Pr@t@p
" रचनापर्व "
6/9/2020
BLOG#prataprachana.blogspot.com

No comments:
Post a Comment