Sunday, April 27, 2025

ढग नाहीसे



कविता अशाच माझ्या
जणू जळत्या वाती
हिरवळ देण्या सृष्टी
जणू तापते माती

थेंब एक पुरेसा 
जिवन तिला पेरण्या
शब्द घेरून घेती
भाव मनीचे घेरण्या

नाही सापडत काही
ती अंतरंगात शिरते
स्वतःस पकडण्या चपखल
जणू वावटळ फिरते

रोज नव्याने लिहणे
शोधण्या.नवे काहीसे
पाऊस पडून जणू
होतात ढग नाहीसे 



("やaraτa ₱)                           
www.prataprachana.blogspot.com




Saturday, April 26, 2025

मुक ललकारी



कोसळला पारिजात
धरणीस पालवी फुटली
गंधाला कवेत घेण्या
हलकी झुळुक सुटली

गंधकणाची सतार
छेडते सुगंधी राग
काळीज देठी माझ्या
येते हलकी जाग

हे एकट वेलीपासून
असे काहीसे तुटते
ललकारी पाखराची
मनास मुक फुटते




("やaraτa ₱)                           
www.prataprachana.blogspot.com

Friday, April 25, 2025

आतूर पारवा


प्रदीर्घ पल्ला गाठुन 
फिरले उदास पारवे 
उष्ण झळ्याचे प्राक्तन 
शिखर माथी गारवे 

हुरहूर घेऊन आले
मोडत पंख वाटा
दुरून वळून बघती
शिखराच्या उंच ललाटा

कोण साधू तेथे
लावून समाधी होता
पारव्याचा खोपा बहुधा
तेथे आधी होता

भेटो साधूस सिद्धी
पारव्यांना मिळो विसावा
साधुच्या काळजात ही
आतुर पारवा दिसावा



("やaraτa ₱)                           
www.prataprachana.blogspot.com


दूरचे निर्माल्य





टिपून घे तू सारे 
जे कधी बोललो नाही 
दाटते मनी उदासी
तिला तोललो नाही

मी भाव फेकला दूर
तो पडला माळरानी
गवत फुल ना खुलते
कुठल्या फुलदाणी

तरीही रानफुलाला
स्वतःचा अनाम रंग
ते निर्माल्ये दुरून वाहिले
गाभारी पांडुरंग!



("やaraτa ₱)                           
www.prataprachana.blogspot.com


चांदनराई





काळजातला प्रेषित 
सूळ हसून वाहतो 
गात्रात उमटल्या वेदना 
दूरुन मुक्याने पाहतो 

भासाच्या खोल दरीतून 
येते आण कानी 
जणू अज्ञात शिंपडे
देहावर देवदयेचे पाणी 

नखशिखांत ओले होण्या
सागरहिंमत ठायी
अवकाश काळीज होतो
फुलण्या चांदनराई



("やaraτa ₱)                           
www.prataprachana.blogspot.com


Thursday, April 24, 2025

काळीजकुळी नक्षी




रेखल्या किती मी येथे
काळीज कुळाच्या नक्षी
ओलांडून तरीही जाती
स्वतःत गुंतले पक्षी 



("やaraτa ₱)                           
www.prataprachana.blogspot.com


हवाली




मोह माया त्यागून
फुल हसते गाली!
गंध करते मुक
खुडत्या हाता हवाली




("やaraτa ₱)                          
www.prataprachana.blogspot.com


Sunday, April 20, 2025

रानहुरूप




शोधती पाखरे 
गळलेली पाने 
पंखानी पाहती
उदासली राने

जलकंपी सुराने
विराणी फिरे
वाळक्या झाडात
तुटलेली घरे

करती जमा
एकेक काटकी
धरा अन्नपूर्णा 
जरी झोळी फाटकी


देईल ती पुन्हा
रानाला हुरूप
होईल सारे
साऱ्यांना सुस्वरूप


("やaraτa ₱)                           
www.prataprachana.blogspot.com


विसाव्याची गाणी



उदासला दिन
आग पाखडतो रवी 
पाखरे शोधती 
सांज छायेची छवी

नदी विसावते
स्वतःच्याच काठी
पाखराचे गीत 
खुले चोचीच्या ओठी

तापलेली भुई
पाहे चांदण्याची वाट
चांद चकाकुन येईल
चुंबन्या ललाट

हळुपावलाने सांज
येते माळरानी
निमत्या श्रष्टीला फुटती
विसाव्याची गाणी



("やaraτa ₱)                           
www.prataprachana.blogspot.com


Friday, April 18, 2025

मैफल





पैंजणवाटा सुन्या 
मुरली राहे मुकी 
जळत्या सूर्याखाली 
सावली ना सुखी 

प्राण ओतूनी शब्द
घडतात किती सुराने
भाव तरी अंतरी
भयदाटके विराणे

द्वारका तळ गाठे
कृष्णाची पारध होते
सुनी सुनी मैफल
कवितेचे प्रारब्ध होते



("やaraτa ₱)                           
www.prataprachana.blogspot.com

                                             




नजरदिवे




भाव माझा सोयरा
शब्द माझा सखा
हाकेचा वरचा सूर
निनादतो मुकमुका

कृपाळ माझी भाषा
भलती सुघड बोले
अंतरात वहीच्या ठाई
शाईचे डाग ओले

मध्य गाठते रात्र
झूळूक सुकवते शाई
शब्दांना घेरून येते
कवितेची निनाद घाई

पळसबनाला स्पर्शती
चांदण्याचे नजरदिवे
झाडाला लगडून येते
फुल एक नवे!



("やaraτa ₱)                          
www.prataprachana.blogspot.com

कवितामेळा




मनी निनादत असतो
कवितेचा घुंगरवाळा
जणू पुकारे नामदेव
वारकऱ्यांचा मेळा

दिंडीत निघती शब्द
कितीक त्यांचे घाट
एक विरहिणी जनी
दिंडीस दावते वाट

अशी चालते वारी
जणू स्वर्गघाई
अंतरी अबीर गुलाल
विठ्ठल दाटका ठाई

ना होते मुख दर्शन
कळस दुरून दिसतो
भावविभोर दिंडी परते
विठ्ठल हलके हसतो

अंतरीची विठ्ठलतृष्णा
कधीच संपत नाही
नित्ये आतली आस
नवनवा अभंग वाही!



("やaraτa ₱)                          
www.prataprachana.blogspot.com

तडे



अश्या एकट क्षणाना
नको विरहाचे धडे 
विस्तारत जाती खोल
काळजाचे तडे 

रानदिव्याला या नको 
वणव्याची छाया
पाखरांची झोप
जाईल ना वाया

कशाला दूर
तुझ्या गावाची वेस
तडा एक एक 
होई कासाविस!



("やaraτa ₱)                           
www.prataprachana.blogspot.com


स्वतः





स्वतःच द्यावा
स्वतःला हात
तोडून परीघ
दुःखावर मात

स्वतःच व्हावे
स्वतःचा प्रकाश
सारावेत दूर
अंधाराचे भास

व्हावे असे काही
देवालय जणू
कृष्ण ओठी बिलगाया
स्वतः यावी वेणू!



("やaraτa ₱)                          
www.prataprachana.blogspot.com

Monday, April 14, 2025

मकरंद

फुलोरा गातो अंतरी
शिशिरगळीचा राग
अंतरातला गंध त्याचा
इच्छितो पाऊलमाग

मुळात त्याच्या राहते
तुझ्या आसेचे पाणी
फुलास बिलगुन असतो
रंग आसमानी

दे तयांना उसना
तुझ्या गिताचा गंध
पुढील चैत्रापावेतो
तगेल मग मकरंद..


("やaraτa ₱)                          
www.prataprachana.blogspot.com

Sunday, April 13, 2025

चाप...!




दिनदुबळया साऱ्यांचा
तू कनवाळू बाप
शोषणकर्त्या विरुद्ध
ताणल्या बंदुकीचा चाप!


१४ एप्रिल २०२५
("やaraτa ₱)                          
www.prataprachana.blogspot.com



राजपथ!




तू गावकुसातून, नसानसातून
पेरून गेला क्रांती
राजपथावर तुझा पायरव
घेऊन आला शांती

हे राष्ट्रविधात्या प्रज्ञासूर्या
तुझा आम्हा अभिमान
राष्ट्रभान तू दिले भारता
देऊन संविधान!!

१४ एप्रिल २०२५
("やaraτa ₱)                          
www.prataprachana.blogspot.com

पथिकमुक्ती!



अंतावरच्या पथिकालाही
तू खुले केलेस राजमार्ग
तू हाटाहाटातुन, गावकुसातून 
पेरुन दिलास स्वर्ग

तुझ्या ज्ञानचक्षुनी तू
अंधार भेदला भारी 
तू कैक पिढ्याचा दाता 
तू हर दुबळ्याचा कैवारी!

१४ एप्रिल २०२५
("やaraτa ₱)                           
www.prataprachana.blogspot.com



बा !माई!


दवापाण्यावाचून स्वतःच मुल मातीआड गेलं
तरी तू झुंजत राहिलास अढळ
मानवता मातीआड जाऊ नये म्हणून!

तुझ्या त्या मुकल्या बाप पणाची भरपाई म्हणून
आम्ही कोटी कोटी लेकरं अभिमानाने
तूला आमचा बाप आणी कुळाचा कुलपुरुष मानतो!


बाळपणापासून तू वाढलास आईविना
तरी तू अनंत यातना झेलूनआम्हावर 
मायेचं आभाळ पांघरलंस



तू आम्हास पोरकं सोडलं नाहीस
त्याची उतराई म्हणून आम्ही सारी लेकरं
तूला आमची आई मानतो!


आम्ही आहोत का तुझ्या वंशाचे दिवे
ते ठरेल इतिहासाच्या साक्षीने.. पण तू
आमचं कुळ मूळ नक्की राहशील!


१४ एप्रिल २०२५
("やaraτa ₱)                           
www.prataprachana.blogspot.com


हाक एकली



ते फुल कुठले होते
जे कडेकपारी फुलले
डोंगर सारे स्थिर 
पायतळातून हलले

फुलास व्यापून आले
हिरवे द्विदल पाते
हवेत दरवळून वाढे
गंधबावरे नाते

नजरेपल्याड फुलूनी
एकटेच ते झुरते
डोंगर पायथ्याला
हाक एकली फिरते...



("やaraτa ₱)                           
www.prataprachana.blogspot.com












Saturday, April 12, 2025

सुरेल विराणी




मठ उदास उदास
जोगीया निघाला
नको साजन दोष
देऊ तू जगाला!

पायतळात गं त्याच्या
भस्माचे ढीग
अंतराच्या वारुळाला
आठवांची रिघ

अस्तावर त्याची
चाले आरंभ पेरणी
नको मांडू तू रमल
ना जमेल सारणी

तुझ्या अंगणात त्याची
घुमेल भिक्षान्देही
तू गाशील विराणी
मग सूरेल आरोही!



("やaraτa ₱)                           
www.prataprachana.blogspot.com






चांदउदयीनी



तू सांधून घे ना मेळ
ही चांद उदयीनी वेळ
नकोस ठेवू फडताळत
भातुकलीचा खेळ

पहा उगवला चांद
भरला काजव्यांचा मेळा
चांदण्याच्या अदमासाला
सांजेचा ठोकताळा

धरा पहा चंदेरी
शालू नेसून बसली
कविता माझी सावळी
चंद्र किरणात हसली

लाव दिवा तू दारी
पडू दे किरण सडा
वाजू दे अंतरी अव्यक्त
आठवांचा चौघडा!


("やaraτa ₱)                          
www.prataprachana.blogspot.com

Friday, April 11, 2025

कटाक्षामागे



सुघड पाषाण जततो
मुर्तिचा फुलमाग
पायरवाच्या मुहुर्ती
ये शब्दास माझ्या जाग

फुलपाखरी चाहूल
हृदयास माझ्या लागे
शब्द वाहण्या स्वतः
निघती कटाक्षा मागे...!



("やaraτa ₱)                          
www.prataprachana.blogspot.com






पक्षी....


मनाची सावली
शब्दावर नक्षी
शांतावेत बनात
तहानले पक्षी...



("やaraτa ₱)                          
www.prataprachana.blogspot.com


नयनतळी



शब्दांचे फुलदेठ
कवितेची कळी
फुलाचे प्रतिबिंब
गर्त नयनतळी....


("やaraτa ₱)                          
www.prataprachana.blogspot.com

Thursday, April 10, 2025

सत्यशोधन



'सत्यशोधनाची',न सोडावी वाट
होई भरभराट,  बहुजनाची ।।
                     ꧁༒प्रताप༒꧂






म.फुले यांना विनम्र अभिवादन!


संगम



मला विसर्जित करायचा आहे
या विरहाचा अस्थीकलश
आप्तास माझ्या दूरच्या
प्रीतीसंगम सापडत नाही!



("やaraτa ₱)                          
www.prataprachana.blogspot.com

अहिस्ता




ताऱ्यांच्या पल्याड असेल 
एक फुलांचा रस्ता 
आणिक पूर्ण चांद 
नित्ये ये आहिस्ता!


("やaraτa ₱)                           
www.prataprachana.blogspot.com


कवितेचा स्वर्ग



मनाचा सगुण देह 
भावांचा आत्मा वसतो
कवितेचा मिळवून स्वर्ग
हलकेच स्मित हसतो!


("やaraτa ₱)                           
www.prataprachana.blogspot.com


त्राही त्राही




डोंगर वाटेला मी 
एक बैरागी पाहीला
काळीज ठेवला रस्ता
मग त्याला मी वाहिला!

घुटमळला तो क्षणभर
रस्ता बदलून गेला
माझ्या रस्त्यावर आढळला
राधारंगी शेला!

ते बैरागी काळीज होते
समीप जाता दिसले
मी पाय धुळीचे ठसे
त्याचे अलगद पुसले

कोण गावचा वेडा तो
रस्ते तुडवत गेला
हाक त्याची हळवी
या हाकेस भिडवत गेला

असेल तो ही शोधत
त्याचे हरवले काही
मी ही त्यासम फिरतो
नित्ये त्राही त्राही!

("やaraτa ₱)                           
www.prataprachana.blogspot.com










तुटवा

फूल जरी का मुक्त 
झाडाचे काळीज तुटते 
फांदीच्या जखमामधुनी 
कळ अनामिक उठते 

गंध जरी का भुलवा 
फुलचूखी ना समीप येते 
हसत्या रान फुलाचे 
असे कलेवर होते 

तुटवा नसे चांगला
असते मूक वेदना
तरीही झाड उमलते
घेऊन नवसंवेदना!


("やaraτa ₱)                           
www.prataprachana.blogspot.com


भाव काजळी









काळीज मुक्याने बुडते 
रवी सोडतो अंबर
सांज दिलासा देते
तमास फुटते हंबर

मी गर्द राईवनातून
शोधून आणतो गाई
अंधार घन बघ झाला
दिवा लाव ना बाई!

ही कसली आर्त भूल
पदराला तुझ्या चिनते?
कबीराची भक्ती घेऊन
गहिवर शेला विणते

धूळ झटक ना बाई!
वासरा गाई मिळल्या
वात दिव्याच्या झाल्या
कविता माझ्या जळल्या!

धरून ओंजळ आडवी
दिवा आत कोण नेईल?
बेवारस निरंजनातून
भाव काजळी होईल!


("やaraτa ₱)                           
www.prataprachana.blogspot.com


करमण्यवाधिकारस्ते....


हे भाव अलिंगन माझे 
मिठीत कोणी नाही 
जणू अश्वथामा रणीचा 
शाश्वत जखम वाही 

झरते रुदन एकले 
राजपाट कोणा मिळती 
महाभारती जीत ही 
जखम एक भळभळती 

शब्द रोवती पाय 
होतात ना ते फिरस्ते 
कविता माझी गाते 
'करमण्यवाधिकारस्ते....


("やaraτa ₱)                           
www.prataprachana.blogspot.com


Tuesday, April 8, 2025

मौनतंद्री




निःशब्द मौनाची तंद्री
भावनांचा एकट मेळा
हृदयी खोल उमाळा
कवितेचा घुंगरवाळा 

नाद खोल हृदयी
अक्षर अक्षर वाजे
एकट गर्द वनातील 
जणू वृक्षी पालवी साजे

जंगल ऐके  केकावली 
गीत मनाचे खिन्न 
सिध्दार्थाला सोडून 
जणू निघाला छन्न 

येवो चैत्र वा शिशिर 
कोणाला काही नसते
घनघोर एकटवेळी 
स्वतःवर जंगल हसते!



("やaraτa ₱)                           
www.prataprachana.blogspot.com











चैत्रमृत्यू





सुकल्या पानफुलांचे
बनते सुंदर चित्र
त्यासाठी का चिंतावे
मरून जावा चैत्र?




("やaraτa ₱)                          
www.prataprachana.blogspot.com


शिंपला



कुण्या नदीचे पाणी
सागर मिठीत अलबत
लाटांच्या तळामुळातून
शब्द उचलते गलबत

वेचत अक्षर मोती
सागर भ्रमण चाले
कवितेचे मोती देण्या
शिंपला हृदय खोले!




("やaraτa ₱)                          
www.prataprachana.blogspot.com







क्षमा



पानावरचे फुल ताजे
वहीत होईल जमा
सुकल्या कवितेतला
भाव मागेल क्षमा!




("やaraτa ₱)                          
www.prataprachana.blogspot.com


Monday, April 7, 2025

बोल





मुक लयीत तुटते
आत खोलवर काही
निनाद ज्याला नाही
त्याला कसली ग्वाही

हळुहळूने उठतो
गहिवर असा का खोल 
उमजत नाही तुजला 
म्हणूनी कशास लावू बोल



("やaraτa ₱)                           
www.prataprachana.blogspot.com






Saturday, April 5, 2025

वेधवंती



त्या पल्याड काठी असते
अबीर संध्या छाया
प्रकाश अल्याड अधिर
तमात व्यापून जाया...

आला जरी का काळोख
चांदणे लूकलूक होईल
पाहता कोर नभीची
उरात धुकधुक होईल

पसरेल स्फटिक चांदणे
चमकून जाईल माती
गावघरातून, नयनतळातून
उजळून येतील वाती

चार नयनाची दिठ
असेल एकच केंद्र
दुरवरचा वेधवंती
नभी टांगला चंद्र...



("やaraτa ₱)                          
www.prataprachana.blogspot.com

 






राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...