निःशब्द मौनाची तंद्री
भावनांचा एकट मेळा
हृदयी खोल उमाळा
कवितेचा घुंगरवाळा
नाद खोल हृदयी
अक्षर अक्षर वाजे
एकट गर्द वनातील
जणू वृक्षी पालवी साजे
जंगल ऐके केकावली
गीत मनाचे खिन्न
सिध्दार्थाला सोडून
जणू निघाला छन्न
येवो चैत्र वा शिशिर
कोणाला काही नसते
घनघोर एकटवेळी
स्वतःवर जंगल हसते!
("やaraτa ₱)
www.prataprachana.blogspot.com

No comments:
Post a Comment