Friday, April 25, 2025

दूरचे निर्माल्य





टिपून घे तू सारे 
जे कधी बोललो नाही 
दाटते मनी उदासी
तिला तोललो नाही

मी भाव फेकला दूर
तो पडला माळरानी
गवत फुल ना खुलते
कुठल्या फुलदाणी

तरीही रानफुलाला
स्वतःचा अनाम रंग
ते निर्माल्ये दुरून वाहिले
गाभारी पांडुरंग!



("やaraτa ₱)                           
www.prataprachana.blogspot.com


No comments:

Post a Comment

आकांत ओवी

उजवू कूठली दिशा देशांतर माझे संपण्या रचू कुठली आकांत ओवी अंतरंग शिळेचे कंपण्या? ₱Ɽ₳₮₳₱) रचनापर्व  www.prataprachana.blogspot.com .