Saturday, April 5, 2025

वेधवंती



त्या पल्याड काठी असते
अबीर संध्या छाया
प्रकाश अल्याड अधिर
तमात व्यापून जाया...

आला जरी का काळोख
चांदणे लूकलूक होईल
पाहता कोर नभीची
उरात धुकधुक होईल

पसरेल स्फटिक चांदणे
चमकून जाईल माती
गावघरातून, नयनतळातून
उजळून येतील वाती

चार नयनाची दिठ
असेल एकच केंद्र
दुरवरचा वेधवंती
नभी टांगला चंद्र...



("やaraτa ₱)                          
www.prataprachana.blogspot.com

 






No comments:

Post a Comment

तोडून...?

गोकुळ निघाले मथुरा अनाथ झाल्या गायी राधा हृदय चालले कृष्ण दिशेने पायी येईल परतून कान्हा देईल हाक हासरी? की थेट वृंदावनी मूक्ती तोडून प्राणप्...