काळीज मुक्याने बुडते
रवी सोडतो अंबर
सांज दिलासा देते
तमास फुटते हंबर
मी गर्द राईवनातून
शोधून आणतो गाई
अंधार घन बघ झाला
दिवा लाव ना बाई!
ही कसली आर्त भूल
पदराला तुझ्या चिनते?
कबीराची भक्ती घेऊन
गहिवर शेला विणते
धूळ झटक ना बाई!
वासरा गाई मिळल्या
वात दिव्याच्या झाल्या
कविता माझ्या जळल्या!
धरून ओंजळ आडवी
दिवा आत कोण नेईल?
बेवारस निरंजनातून
भाव काजळी होईल!
("やaraτa ₱)
www.prataprachana.blogspot.com

No comments:
Post a Comment