Thursday, April 10, 2025

त्राही त्राही




डोंगर वाटेला मी 
एक बैरागी पाहीला
काळीज ठेवला रस्ता
मग त्याला मी वाहिला!

घुटमळला तो क्षणभर
रस्ता बदलून गेला
माझ्या रस्त्यावर आढळला
राधारंगी शेला!

ते बैरागी काळीज होते
समीप जाता दिसले
मी पाय धुळीचे ठसे
त्याचे अलगद पुसले

कोण गावचा वेडा तो
रस्ते तुडवत गेला
हाक त्याची हळवी
या हाकेस भिडवत गेला

असेल तो ही शोधत
त्याचे हरवले काही
मी ही त्यासम फिरतो
नित्ये त्राही त्राही!

("やaraτa ₱)                           
www.prataprachana.blogspot.com










No comments:

Post a Comment

तोडून...?

गोकुळ निघाले मथुरा अनाथ झाल्या गायी राधा हृदय चालले कृष्ण दिशेने पायी येईल परतून कान्हा देईल हाक हासरी? की थेट वृंदावनी मूक्ती तोडून प्राणप्...