Friday, April 18, 2025

कवितामेळा




मनी निनादत असतो
कवितेचा घुंगरवाळा
जणू पुकारे नामदेव
वारकऱ्यांचा मेळा

दिंडीत निघती शब्द
कितीक त्यांचे घाट
एक विरहिणी जनी
दिंडीस दावते वाट

अशी चालते वारी
जणू स्वर्गघाई
अंतरी अबीर गुलाल
विठ्ठल दाटका ठाई

ना होते मुख दर्शन
कळस दुरून दिसतो
भावविभोर दिंडी परते
विठ्ठल हलके हसतो

अंतरीची विठ्ठलतृष्णा
कधीच संपत नाही
नित्ये आतली आस
नवनवा अभंग वाही!



("やaraτa ₱)                          
www.prataprachana.blogspot.com

No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...