आभाळास पावसाळी हाक
ढगास वाट फुटावी
ताज्या फुलाची हवा
फांदीस सुगंधी सुटावी
चांद मंद भिजावा
चांदणे बरसत जावे
उन्हाचे विरघळले पण
झावळीत विरसत जावे
थेंब संगीत व्हावे
जमीनीस फुटावे संगीत
काळ्या ढगाच्या अंतःकरणी
लगडावे इंद्रधनु रंगीत
खिडकीचे नशीब खुलावे
पाऊस धावून यावा
सुकल्या निर्माल्याचा
सडा वाहून जावा
वाटेस बहर यावा
पाउलठशांची नक्षी
भिजल्या पंखाआड दडावेत
सुखावलेले पक्षी
पानांना सळसळ यावी
हवेस बहर यावे
हर सरीचे काळीज
गुलाबी प्रहर व्हावे
मी पेरून द्यावा पाऊस
हिरवा माळ व्हावा
पाखरांच्या पंखांचा
अभंगी टाळ व्हावा
मी गीत लिहुन द्यावे
अवकाश भरून यावा
भावार्थ माझ्या शब्दांचा
धरतीत झरून जावा...
Pr@t@p
" रचनापर्व "
28/8/2020
BLOG#prataprachana.blogspot.com
ढगास वाट फुटावी
ताज्या फुलाची हवा
फांदीस सुगंधी सुटावी
चांद मंद भिजावा
चांदणे बरसत जावे
उन्हाचे विरघळले पण
झावळीत विरसत जावे
थेंब संगीत व्हावे
जमीनीस फुटावे संगीत
काळ्या ढगाच्या अंतःकरणी
लगडावे इंद्रधनु रंगीत
खिडकीचे नशीब खुलावे
पाऊस धावून यावा
सुकल्या निर्माल्याचा
सडा वाहून जावा
वाटेस बहर यावा
पाउलठशांची नक्षी
भिजल्या पंखाआड दडावेत
सुखावलेले पक्षी
पानांना सळसळ यावी
हवेस बहर यावे
हर सरीचे काळीज
गुलाबी प्रहर व्हावे
मी पेरून द्यावा पाऊस
हिरवा माळ व्हावा
पाखरांच्या पंखांचा
अभंगी टाळ व्हावा
मी गीत लिहुन द्यावे
अवकाश भरून यावा
भावार्थ माझ्या शब्दांचा
धरतीत झरून जावा...
Pr@t@p
" रचनापर्व "
28/8/2020
BLOG#prataprachana.blogspot.com