Saturday, April 30, 2022

वाणी.....

तो श्यामल होता म्हणूनी
पाऊस दाटला होता
की हृदयास कुणाच्या आर्त
पान्हा फुटला होता?

हे थंड हवेचे झोत
जणू काळीज बोलले रानी
झडल्या मोरपिसाची
वाणी..दिनवाणी.....
(Pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
३० एप्रिल २०२२



तुझी कविता...

दिवसाला माझ्या
नसे न तुझे वावडे
तारकांच्या अंतरी
कांती तुझी मी सावडे

प्राजक्ताचे माळ फुलती
गळ्यात येते अंबर
मी तुझ्या आशेचे गगनी
पेरून देतो हंबर

ही निसटती साऊलवेळ
मी काय धरू पाहतो?
झिरमिर तुझ्या आभासी
चांदण्या अगणित वाहतो

त्या पल्याड शिखरावरूनी
चंद्र कसा बघ दिसतो?
बावर एकल्या वेळी
तो ही उदास हसतो

माझ्या चांदण शब्दी
त्याचा उजेड घेतो
भाव तुझा दाटूनी मी
तुझी कविता होतो...
(Pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
३० एप्रिल २०२२

Thursday, April 28, 2022

माग....

....मी हरवलो असता
माग तुझा मज लागे
मग शब्द घेवून निघतो
मी तुझ्या कविते मागे....

(Pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२८ एप्रिल २०२२

Saturday, April 23, 2022

युगदक्षी वृक्ष

उमगत नाही मला
तुझे मोसमी वागणे
मी ही सारे बहर मग
ओंजळीतून सांडून देतो...

तु येशील पुन्हा तेथे
जेथे हरवतो आपण
एक खुणेचा दगड मग
मी तेथे मांडून येतो

राहवत नाही तरीही
तु धरतेस अज्ञात दिशा
परततेस ही अशीच
घरटी पाखरजोड्या जशा

मी स्थिर असतो उभा
जणू प्राचिन वृक्ष
बहर तुझे सोसण्या
युगायुगाचा दक्ष!
(Pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२३ एप्रिल २०२२





Thursday, April 21, 2022

रानकावा....

तुझ्या नयनातील
ही प्राचिन हाक...?
तुझ्या माझ्या अस्तित्वाचा
हा आदिम गोंजर....
जंगलाच्या तळामुळात
होणारी एक आर्जवी सळसळ..

या भावविभोर मुहूर्तावर मग..
गळतात काही पानं
झडतात काही फुलं
मी बावर ओंजळीत
जमवतो हा हळवा रानकावा..

पाहतो त्यास कधी
दुरून कधी श्वासांच्या
अंतरावरून...
स्वतःला हरवून..मग..
मला आतुन घुमारे फुटतात

मी त्यांना तुझे भावरंग देतो
आणी बदल्यात मिळवतो..
एक भावगर्भी कविता..
तुझ्या हरवल्या दिशेला
अर्ध्य देण्यासाठी....

तुझ्या या हाकांचे
ऋतु येतात बेमोसमी
देतात फुलवे..पानझड
आणी माझे मन ..
कधी वसंत..कधी शिशिर
बनून व्यापते..
तुझ्या आभासाचे जंगल..
(Pr@t@p)
"रचनापर्व"
गझलांचे स्पंदन -मुक्तछंद
www.prataprachana.blogspot.com
२२ एप्रिल २०२२



Wednesday, April 20, 2022

गीत अनोखे...

गीत उमगलेआहे
मला तुझ्या मनाचे
शब्द तयास माझे
अलगद बिलगुन जाती

गुणगुण नसते जेंव्हा
शब्द पोरके माझे
अर्पूण सारे भावार्थ
ते गुपचूप विलगून जाती

त्या विलगल्या शब्दांची
मी कविता एक रचतो
आणी पुन्हा तुला अनोखे
गीत बनून सुचतो.....
(Pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२१ एप्रिल २०२२








Tuesday, April 19, 2022

आत्मशोध....

शब्दांची संगत..
ते या साठी की
मी मला पाहतो
मुक संवेदनेच्या
प्रदेशात हरवलेले

शब्द वेचता वेचता
वाटते पोहचेन मी
या जंगलापार सुखरूप
आणी दिसेल
मला तुझे बिलोरी गाव

विचारेन मग एखाद्या
वाटसरूस तुझा ठिकाणा
आणी सापडेल मग मला
माझी युगापुर्वी हरवलेली
ओळख........!
(Pr@t@p)
"रचनापर्व"
गझलांचे स्पंदन -मुक्तछंद
www.prataprachana.blogspot.com
१९ एप्रिल २०२२



रंगीत दिशा...

झाड उभे बघ एकले
बहरही हसत नाही
तु गेल्या पासून फांदीवर
बुलबुलही बसत नाही

जाता जाता त्याने
सोबत सुर गीताचे नेले
शब्दांनी माझ्या रोखली
झडणारी रंगीत फुले

तो येईल म्हणून नित्य
मी फुल ढळू देत नाही
दुःख माझ्या शब्दांचे
झाडास कळु देत नाही

येईल बुलबुल कधी
गाईल सुंदर गाणे
झाड सोसते आठवण
पराकोटीच्या धिराने...

तिकडेही असते बहुधा
बहराची व्याकुळ आशा
पावलांनी का सजवू नये
झाडाची रंगीत दिशा?
(Pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१९ एप्रिल २०२२





Monday, April 18, 2022

भेट....

नव्हता दिला शब्द
आपण पुन्हा भेटू
तु ही मुक अनामिक
का थांबली होती?

शोधत गेलो वाटा
एकमेकांना भिडणा-या
निघण्याच्या इराद्याची
ती भेट लांबली होती


उगाच होता देखावा
सारे निसटल्याचा
हाक ओली आर्त
पापणीत ओथंबली होती

(Pr@t@p)
"रचनापर्व"
गझलांचे स्पंदन -मुक्तछंद
www.prataprachana.blogspot.com
१९ एप्रिल २०२२




भावविभोरी आण...

शोधत तुला मी गेलो
एकोप्याच्या समयी
आता ठाव मला माझा
कसलाच लागत नाही...

दे हात तुझा हाती
सय दाटल्या वेळी
फक्त समीप असावे तु
बाकी काही मागत नाही

अर्थ तुला तरी लागतो
आपल्या वेडेपणाचा?
शहाणे असुनही दोघे
तसे शहाणे वागत नाही

देवून दुराव्याची आण
तु कधी मौन साधले होते
आण तुझी भावविभोरी
शब्दांना जागत नाही......
(Pr@t@p)
"रचनापर्व"
गझलांचे स्पंदन -मुक्तछंद
www.prataprachana.blogspot.com
१८ एप्रिल २०२२




...


Sunday, April 17, 2022

निनावी लोकगीत

तु किस्से सांगत असताना
माझा ओझरता उल्लेखही
करू नकोस...!
माझे निनावी शब्द
आताशी कुठे
लोकगीत बनत आहेत

तु शिताफीने टाळ
माझे पुसले गडद
संदर्भ ...
जखमा तशाही
उघड्या
लवकर ब-या होत नाहीत..!!

(Pr@t@p)
"रचनापर्व"
गझलांचे स्पंदन -मुक्तछंद
www.prataprachana.blogspot.com
१८ एप्रिल २०२२







निद्रापक्षी.....

किती करशील झोपेचा धावा
तु थकल्या तुझ्या मनाने
पक्षी तुझ्या निद्रेचा
माझ्या फांदीवरूनी उडून गेला!!





(Pr@t@p)
"रचनापर्व"
गझलांचे स्पंदन -मुक्तछंद
www.prataprachana.blogspot.com
१७ एप्रिल २०२२


ओंजळ...


नसतीलही मजकडे फुले
वाहता येतील इतके
ओंजळ तुझीही मजला
तितकी विशाल भासत नाही...


(Pr@t@p)
"रचनापर्व"
गझलांचे स्पंदन -मुक्तछंद
www.prataprachana.blogspot.com
१७ एप्रिल २०२२

Saturday, April 16, 2022

बहरप्रश्न....

मी निघालो खरा तेथून
मग मागे कोण राहिले?
पाषाणाच्या आत खोलवर
मी गंध फुलांचे पाहीले

ते झाड आता ही फुलते?
की त्याचेही बहर गेले?
की पक्षांनी मोडली वस्ती
अन् त्याचेही पाषाण झाले?

उतरायला हवे होते तु ही
कदाचित गर्तता कळली असती
एक लाट माझी संथ
तुझ्या लाटेस मिळली असती

हे सागरी मौन घेवून
आता मी नदीस काय बोलू?
नुकताच थेंब धारला
हा शिंपला कशास खोलू?

तु पाषाणातील फुल जप
जरी फांदीचा त्यास सोस
बहराचा काय भरोसा!
तो फुलेलही भरघोस!!

नसेल फांदी,नसेल झाड
तो येईल ना नेहमी सारखा
मी ही नसेन,नसशील तुही..
तर होईल ना तो पारखा

असो! येईल तो नव्याने
त्यास एक फुल माग
नाही पुकारले तुला मी..
का यावी तुला मग जाग?

मी बहराचे सारे पाश
केंव्हाच सोडले मागे
तरीही नयन तुझे बघ जागे
ध्यास कसला त्यांना लागे?

नकोस पाठवू हाक
हा रस्ता वळत नाही
काय करू तुझ्या बहराचे?
मग...मलाही कळत नाही.....
(Pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१७ एप्रिल २०२२





















Friday, April 15, 2022

शोध.....

तु असतेस खोलवर
माझ्या आत कुठे तरी..
कवितेच्या काजवउजेडी
म्हणून का रोजच शोधू...?

कधीतरी या दारात
पेटव दिप आस्थेने
किती दिवस अंधाराशी
मी एकट्यानेच बोलायचे....?

(Pr@t@p)
"रचनापर्व"
गझलांचे स्पंदन -मुक्तछंद
www.prataprachana.blogspot.com
१६ एप्रिल २०२२


ओळख.....


 

ही हवा परत आलीय
माझेच दुवे घेवून
तु खुशाली तरी
पाठवायचीस..?!
अनोळखी होण्यालाही
असतात काही मर्यादा..

नाही तर ....
पडलाच कधी तुझ्या
ओळखीचा विसर तुला...
तर.....
फिरशील तु वणवण
माझ्या अनोळखी
शहरात.....
माझ्या ओळखीतली
तगतग पेरत...!

तरीही....
लागतच नसेल तुला
तुझी जन्मजात ओळख...
तर ये इथे तुझ्या नावचे
महाकाव्य पडलेत!!

माझ्या ओळखीचं काय?
असंही मी रोज शोधतो मला
माझ्या कवितेच्या झाडीत..
तरीही हाताला लागतो
तुझाच फुलोरा.....!!

तुझ्या ओळखीचं रूपांतर
अनोळखीत होणं...
तसंही कवितेला
ओळखता येतं माझ्या.....!!

(Pr@t@p)
"रचनापर्व"
गझलांचे स्पंदन -मुक्तछंद
www.prataprachana.blogspot.com
१६ एप्रिल २०२२

पक्षावरचा लळा....

मी असतो म्हणून पक्षीही
तेथेच रेंगाळत बसतात
तुझ्यात बुडले क्षण तसेही
मनमोहक खास असतात

आम्ही बोलतो, ऐकतोही
शेवटी होतो मुके
मग अनूभवतो दोघेही
तुझ्या आभासाचे खोल धुके

शब्द शब्द व्यापत मग
कविता एक लिहतो
ती ही बनते साथी
व्याकुळ तीला मी पाहतो

चंद्र उगवतो,पडते चांदणे
पक्षी निरोप घेती
कविता, मी आणी तू
नसतेच काही हाती

रात सरते,दिवस उगवतो
डोळे माझी शिणती
पक्षांचे निरोप खोटे
नसे न त्यांची गिणती

तरीही तुटत नाही
माझा पक्षावरचा लळा
ते वाटून घेतात मजसवे
तु नसल्याच्या झळा....
(Pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१५ एप्रिल २०२२






Thursday, April 14, 2022

सुहृदयी भास..!

असे ही माझे शब्द
तुला काही मागत नाहीत
तुटक असे तुजसारखे
कवितेत वागत नाहीत

असा ही माझा भाव
नसतोच कधी रूक्ष
कधी मांडतही नाही
तो मुक मनाचा पक्ष

तसाही तुझा चेहरा
नसतोच कधी धुसर
कवितेच्या ओळीवरती
दिसतो त्याचा असर

असेही काय मिळते
एकट्याने मुके राहून?
म्हणून एक कविता
देतो मी तुला वाहून

तळ्याकाठी शोधली होती
कधी गतजन्मीची कथा
दुःख तळ्यात झुरते
लाटांची पाहून व्यथा

कधी काढला होता माग
श्वासांचे उकलत गुज
मी कवितेच्या आड राखतो
तुझ्या शब्दांची हळवी बुज....

होईल किती ॠण माझ्या
कवितेच्या तुझ्या हृदयी?
मी ठेवून बाकी सारी
भासेन तुला सुहृदयी!

(Pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१५ एप्रिल २०२२







Sunday, April 10, 2022

शब्दांचे माझ्या गुंजन...

शब्द ..
अबोला..
सारे तुझेच देणे
तुझेच असते सारे
माझे होणे
वा न होणे

ध्यास..
आस..
सारे तुझ्याच पायी
तुलाच असते बहुधा
सारे संपवण्याची
घाई

हसणे
रूसणे
सारे तुझेच असते
मन असे रातीला
घनव्याकुळ बिलगुन
बसते...

निघणे
थांबणे...
तुलाच सारे कळते
दुर डोंगरमाथी अंधारात
मन माझे
एकट विराण जळते

दुरावा..
परकेपण..
जणू तुझे रंजन
अशांत तुझ्या
मनास व्यापते
शब्दांचे माझ्या गुंजन...
(Pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१० एप्रिल २०२२






Saturday, April 9, 2022

गझलांचे स्पंदन




अंदाज तुझे मी , घेवू कशाला
असतेच खात्री बेभरवशाची!







(गझलाचे स्पंदन...)
( ~Pr@t@p~)
१० एप्रिल २०२२
www.prataprachana.blogspot.com


गझलियत

गेलो अनेक वाटा ,तुझ्या हाकांच्या मागे
ही मुशाफिरी माझी, संपता संपत नाही!

हा तंटा आठवणीशी, रातीत सुरू होई
वाद तु नसण्याशी, मिटता मिटत नाही!

तोडून सारे पाश, प्रस्थान करावे कोठे?
जिव तुझ्यावर जडला ,तुटता तुटत नाही!

सोडवले अनेक कोडे,अनाहूत आलेले
कोडे तुझे गुलाबी, सुटता सुटत नाही!

खिडकी वर बसला पक्षी,निरोप तुझा घेवूनी
जरी धरला अबोला त्यासी , तो उठता उठत नाही!

हौस तुझी घनभारी,आयुष्यास बिलगे
देवून सारे सारे , ती फिटता फिटत नाही!

(गझलांचे स्पंदन...)
( ~Pr@t@p~)
१० एप्रिल २०२२
www.prataprachana.blogspot.com

अपेक्षेची अक्षयझोळी....

हाक तरी का द्यावी
अशा काहूर घडी?
कुण्या काळोखात माझ्या
व्याकुळाची दडी?

येईल म्हणुनी कोणी
अंथरलेल्या वाटा
पुनवेत संकोचल्या
ओहोटीच्या ओल्या लाटा

प्राक्तनाचे वाहिले फुल
दगडास कधी का लागे?
देवळाच्या गाभा-याला
मुर्ती आसरा मागे

ढग असा का जळतो
त्वचेच्या रंध्राखाली?
अवकाश साजरा होऊन
गाठे नयनतळाची खोली

तु दिले अनाहूत वेळी
तुझ्या अस्तित्वाचे पिंजण
एकोप्याच्या बनात बहरे
आठवणीचे रंजन

हे झाड कुणाच्या बहराने
असे अवेळी वाकले?
तु न दिल्या फुलांनी मी
देऊळ सारे झाकले

होती वेळ अशी की
वेळ अशी ती नव्हती
मी नव्हतो तुझ्या अवती
अन् तु माझ्या भोवती

होते असे ते काही
जणू काहीच जसे नसते
ना माझे काही येथे
ना काही तुझे असते

तरीही असते आस
तु यावे अशा त्या वेळी
मागण्यापुर्वि ओसंडावी
अपेक्षेची अक्षयझोळी...
(Pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
९ एप्रिल २०२२


















Thursday, April 7, 2022

मुक्तीस्पर्श...

तुझ्या स्पर्शाच्या मैफलीत
हरवले माझे गाणे
मी शोधत असता मला
अंतरी तुझ्या धिराने

श्वास भारती धुन
अंतरी गेली शिलगुन
मी मुक्तीचा श्वास घेई
तुला मुक्याने बिलगून

सांगावा घेवून येते
नयनाची जोडी गर्त
सांजेची बावरधुन
होते अजूनी आर्त

शोधत असता काही
हरवून जाते सारे
तु शिंपीत असता मजवर
आस दाटले तारे

एक अनामिक गहिवर
तुझा पुकारा करतो
तु गेल्या क्षणाच्या प्रहरी
स्पर्शाचा ठसा उरतो...
(Pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
७ एप्रिल २०२२







Tuesday, April 5, 2022

आठवणींचे भोग...

या लहरी ही आवर्तने..
तुला आठवण आली?
कविता माझी उधाण
शब्दांची गाठते खोली

मी चैत्र पाहतो फांदी
रावा परतुनी आला
दुर ढगाच्या कुशीत
उडे पक्षांची रेखीवमाला

झाड मागे फुलांना
बहराची रंगीत ओळख
शब्दांने पेटवत असता
आठवणींचा काळोख

या तपस्वी संध्याकाळी
धुपते आठवणीची धुनी
पिंपळाच्या झाडाखाली
हा दिप ठेवला कुणी?

उजेड घेवून शब्द
शोधत तुला निघती
नित्य संध्याकाळी मी
बनतो तुझा जोगती

दाटून येतो मनी
तुझ्या आभासाचा जोग
कविता माझी भोगते
तुझ्या आठवणींचे भोग.....
(Pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
५ एप्रिल २०२२











#जखमेचं अप्रूप

या जखमेचं
काय करावं ?
सहन..?
दुर्लक्ष..
की...
मनवावा तीचा 
वेदनामय
सोहळा?
...असो..!
'ती आपल्याच 
कुणीतरी दिलीय...'
एवढंच तिचं
अप्रूप!
(प्रताप)
www.prataprachana.blogspot.com

Monday, April 4, 2022

हाकेतील अर्थ...

सुखाचे वसंती
अंकूर दे मला
कशाला टांगावा
जिव टांगणीला

खोप्यातल्या कथा
जात्यावर गाव्या
बैलघुंगराच्या हाका
दाटून त्या याव्या

हिरव्या शिवारी
पिक पिवळे पिवळे
दिप माझा तुझ्या
वातीला जळवे

चिमणीचे गीत
येते भित भित
कळेना तुला
घरोप्याची प्रित

उठ लवकर
दारी कोण आले?
पावलाचे ठसे
ठेवून ते गेले

दे एक हाक
होउन तु आर्त
मी पेरतो शब्दात
तुझ्या हाकेतील अर्थ...
(Pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
४ एप्रिल २०२२













Saturday, April 2, 2022

तळ्याकाठी....

असाच नाही निघालो...
अंतरी गाव तुझे साचलेले
ते शब्दही सोबत माझ्या
तु तन्मयतेने वाचलेले

घेवून तुझा भाव मी
लिहीलेल्या अनंत गझला
जाग्या माझ्या शब्दाखाली
चंद्र कितीदा विझला

निर्जन तळ्याच्या काठी
आपली नजर राहीली मागे
रातीच्या साजनवेळी माझे
शब्द व्याकुळ जागे

शब्द भरून येती
मुक पाणवठ्याचे गाणे
भाव माझे निघती
तुझ्याकडे अनवाणे

घे ओढून सारी स्वप्ने
निद्रेच्या शेल्याखाली
सावळ रंगी रातीस
चांदण्याची बाधा झाली

ही गवत वाळली पाने
हवेस पाझर फुटतो
शब्दांच्या भावव्याकुळाने
चंद्र पापणी मिटतो

तु व्यापल्या आकाशाखाली
ते तळे तुझ्यात भिजले
श्वासाच्या समीप तुझे
सुंदर डोळे सजले

तळ्यात चंद्र बुडला
ओले तुझे आभास
मी भारून दुर निघालो
तुझे रेंगाळते श्वास

दे हाक कधी उधाणी
निघणे माझे टळेल
तळ्याच्या काठावरती
मग सांज नव्याने कळेल

अशा कातीव सांजवेळी
मग पुन्हा आपण भेटू
चांदण्याच्या कल्लोळाखाली
एक निरव शांतता थाटू......!

(Pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
३ एप्रिल २०२२













राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...