Saturday, April 23, 2022

युगदक्षी वृक्ष

उमगत नाही मला
तुझे मोसमी वागणे
मी ही सारे बहर मग
ओंजळीतून सांडून देतो...

तु येशील पुन्हा तेथे
जेथे हरवतो आपण
एक खुणेचा दगड मग
मी तेथे मांडून येतो

राहवत नाही तरीही
तु धरतेस अज्ञात दिशा
परततेस ही अशीच
घरटी पाखरजोड्या जशा

मी स्थिर असतो उभा
जणू प्राचिन वृक्ष
बहर तुझे सोसण्या
युगायुगाचा दक्ष!
(Pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२३ एप्रिल २०२२





No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...