Saturday, April 9, 2022

गझलियत

गेलो अनेक वाटा ,तुझ्या हाकांच्या मागे
ही मुशाफिरी माझी, संपता संपत नाही!

हा तंटा आठवणीशी, रातीत सुरू होई
वाद तु नसण्याशी, मिटता मिटत नाही!

तोडून सारे पाश, प्रस्थान करावे कोठे?
जिव तुझ्यावर जडला ,तुटता तुटत नाही!

सोडवले अनेक कोडे,अनाहूत आलेले
कोडे तुझे गुलाबी, सुटता सुटत नाही!

खिडकी वर बसला पक्षी,निरोप तुझा घेवूनी
जरी धरला अबोला त्यासी , तो उठता उठत नाही!

हौस तुझी घनभारी,आयुष्यास बिलगे
देवून सारे सारे , ती फिटता फिटत नाही!

(गझलांचे स्पंदन...)
( ~Pr@t@p~)
१० एप्रिल २०२२
www.prataprachana.blogspot.com

No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...