Saturday, April 30, 2022

तुझी कविता...

दिवसाला माझ्या
नसे न तुझे वावडे
तारकांच्या अंतरी
कांती तुझी मी सावडे

प्राजक्ताचे माळ फुलती
गळ्यात येते अंबर
मी तुझ्या आशेचे गगनी
पेरून देतो हंबर

ही निसटती साऊलवेळ
मी काय धरू पाहतो?
झिरमिर तुझ्या आभासी
चांदण्या अगणित वाहतो

त्या पल्याड शिखरावरूनी
चंद्र कसा बघ दिसतो?
बावर एकल्या वेळी
तो ही उदास हसतो

माझ्या चांदण शब्दी
त्याचा उजेड घेतो
भाव तुझा दाटूनी मी
तुझी कविता होतो...
(Pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
३० एप्रिल २०२२

No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...