Thursday, April 14, 2022

सुहृदयी भास..!

असे ही माझे शब्द
तुला काही मागत नाहीत
तुटक असे तुजसारखे
कवितेत वागत नाहीत

असा ही माझा भाव
नसतोच कधी रूक्ष
कधी मांडतही नाही
तो मुक मनाचा पक्ष

तसाही तुझा चेहरा
नसतोच कधी धुसर
कवितेच्या ओळीवरती
दिसतो त्याचा असर

असेही काय मिळते
एकट्याने मुके राहून?
म्हणून एक कविता
देतो मी तुला वाहून

तळ्याकाठी शोधली होती
कधी गतजन्मीची कथा
दुःख तळ्यात झुरते
लाटांची पाहून व्यथा

कधी काढला होता माग
श्वासांचे उकलत गुज
मी कवितेच्या आड राखतो
तुझ्या शब्दांची हळवी बुज....

होईल किती ॠण माझ्या
कवितेच्या तुझ्या हृदयी?
मी ठेवून बाकी सारी
भासेन तुला सुहृदयी!

(Pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१५ एप्रिल २०२२







No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...