Sunday, April 17, 2022

ओंजळ...


नसतीलही मजकडे फुले
वाहता येतील इतके
ओंजळ तुझीही मजला
तितकी विशाल भासत नाही...


(Pr@t@p)
"रचनापर्व"
गझलांचे स्पंदन -मुक्तछंद
www.prataprachana.blogspot.com
१७ एप्रिल २०२२

1 comment:

  1. सर,
    आपल्या रचनापर्व या ब्लॉग ला आपल्या कविता आणि मी ते अधिकारी हे लेख वाचत असतो,आपण अधिकारी म्हणून काम करताना जी सामाजिक बांधिलकी आणि सहवेदना ठेऊन काम करता त्यामागे आपण केलेला संघर्ष आणि त्यातून उपेक्षितांचा आवाज बनून काम करण्याची वृत्ती अधोरेखित होते,अगदी नक्षलग्रस्त भागात आदिवासींना हजारो वर्षांपासून नाकारलेले हक्क आपण मिळवून दिलेत तर वंचितांची दिवाळी आणि 14 एप्रिल साजरी केलीत,प्रशासनात एकाचवेळी आदरयुक्त भीती वाटते ती त्यामुळेच.

    तू काळाचा कालातीत ठसा
    तू मानवतेचे गोंदण
    आमच्या सुखासीनआयुष्याचे
    तू संजीवक कोंदण

    असे 'जेव्हा तू आभाळ दिलेस' या कवितेत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना म्हणता तसेच

    तू मोडत नाहीस तुटतही नाहीस
    तू होतही नाहीस नामशेष
    मानवतेच्या कणाकणातून
    दिसतात तुझे अवशेष

    असे 'गांधी मरत नाही,मारला जातो' असे बापूबद्दल लिहिता तेव्हा आपल्यातील संवेदनशील कवीने महात्म्याशी साधलेला संवाद आजच्या समाजातील भळभळणारी जखम आहे तशी दाखवलेली असते

    रस्त्यावर शोध मला
    तू चांदणेही ढवळून काढ
    अंधारात पाहून घे
    उभे एकले झाड

    असे प्रेयसीला म्हणताना एकाचवेळी विरह तर चांदणे ढवळून काढायला लावून त्याची मखमली शीतलता असे अनुभव येतात

    'ही सांजबहराची वेळ
    काहूर बनाचे सडे'
    'एकाकी पणाच्या सांजवेळी
    प्रतिक्षेचा दिवा जाळून घे'
    'चंद्राला भिडतात मग
    ओल्या आठवणींचे झुले'
    'ढग व्याकुळ होऊनी
    थेंब फुलातून झडतो'

    अशा कित्येक ओळी आम्हाला ग्रेसच्या कवितेचा सायंकालीन गूढ भावार्थ चा प्रत्यय देतो,ग्रेसचे गारुड अजून आपल्या कविमनातून गेले नाही असे दिसते,परंतु आपली कविता ही उन्हाच्या रखरखतेतून आलेल्याला चंद्राची शीतलता देते
    असो,आपली लेखनी अशीच लिहीत राहो आणि आम्हाला लवकरच या कविता पुस्तक रूपाने दिसाव्यात ही अपेक्षा आणि हो आपल्यातील कविनामाचा वकिली बुद्धीचा अधिकारी लोकांना अशीच सेवा देत राहो ही सदिच्छा🎍

    आपला🙏🏻
    दिलीप शेनफड सोनवणे
    जालना

    ReplyDelete

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...