Monday, April 4, 2022

हाकेतील अर्थ...

सुखाचे वसंती
अंकूर दे मला
कशाला टांगावा
जिव टांगणीला

खोप्यातल्या कथा
जात्यावर गाव्या
बैलघुंगराच्या हाका
दाटून त्या याव्या

हिरव्या शिवारी
पिक पिवळे पिवळे
दिप माझा तुझ्या
वातीला जळवे

चिमणीचे गीत
येते भित भित
कळेना तुला
घरोप्याची प्रित

उठ लवकर
दारी कोण आले?
पावलाचे ठसे
ठेवून ते गेले

दे एक हाक
होउन तु आर्त
मी पेरतो शब्दात
तुझ्या हाकेतील अर्थ...
(Pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
४ एप्रिल २०२२













No comments:

Post a Comment

अत्त दिप भव!

शाक्यमूनी तथागता! वैशाख पोर्णिमेस तू पद्मफूलावर पाय देत अवतरलास ! मात्र ! बूध्दत्व साधण्यासाठी तू धुंडाळलेस कितीतरी काटेरी मार्ग! निकराने नि...