Friday, April 15, 2022

पक्षावरचा लळा....

मी असतो म्हणून पक्षीही
तेथेच रेंगाळत बसतात
तुझ्यात बुडले क्षण तसेही
मनमोहक खास असतात

आम्ही बोलतो, ऐकतोही
शेवटी होतो मुके
मग अनूभवतो दोघेही
तुझ्या आभासाचे खोल धुके

शब्द शब्द व्यापत मग
कविता एक लिहतो
ती ही बनते साथी
व्याकुळ तीला मी पाहतो

चंद्र उगवतो,पडते चांदणे
पक्षी निरोप घेती
कविता, मी आणी तू
नसतेच काही हाती

रात सरते,दिवस उगवतो
डोळे माझी शिणती
पक्षांचे निरोप खोटे
नसे न त्यांची गिणती

तरीही तुटत नाही
माझा पक्षावरचा लळा
ते वाटून घेतात मजसवे
तु नसल्याच्या झळा....
(Pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१५ एप्रिल २०२२






1 comment:

  1. i like this article, thanks for sharing very amazing content, keep it up
    By: FinanceTube

    ReplyDelete

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...