Saturday, December 31, 2022

हाकेची आकाशगंगा


काळ चालतो आहे
....अनादी पासून
अनंता पर्यंत.....
आपल्या घटिक गतीने
एकेक युगांचे
तो घेतोही विसावे क्षणीक..
आपले चक्र
स्तब्धवून...!

त्याची सहयात्री
म्हणून तुला दिलेली
माझी हाक
ती ही चालते आहे
अनंताचा प्रवास...
अनादी पासून
अनंताकडे...

त्या माझ्या हाकांचे
हरयुगीन काफिले
संचित करून
काळ बनवतो आहे
एकेक आकाशगंगा
आणी पसरवतो आहे
प्रदिर्घ अंतराळात
.... हे अंतराळ असेच
विस्तारते आहे माझ्या
हाकेगणीक....

आणी तु......
तुझ्या नजरपशात
येऊ एवढ्याच
या आकाशगंगेतील
तारकांचे लावते आहेस
अन्वयार्थ
कसले बसले नक्षत्र बनवून...
कधी शततारका,
कधी विशाखा,
कधी हस्त,
कधी चित्रा
कधी रेवती
कधी धनिष्ठा
असे काहीबाही
नामाभिधान देत..

या हाकांच्या
अनंत आकाशगंगा
कधी पाहशील तु
ओंजळीत घेऊन एकत्र?

"やraτa प"
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१.१.२०२३







चंद्रांतर.....


सांजबुडीच्या वेळी
एकांत विरळ विरतो
मी चंद्र एकला होऊन
तुझ्या घरावर फिरतो

पानाची जाळी शुष्क
अनाथ पडते रानी
रात मुक्याने गाते
नक्षत्रांची चांदणगाणी

चांदसखा मी होऊन
असतो उजाड जागा
शब्दांचा आत्मा जळतो
होऊन वातीमधला धागा

शब्दांचे मनोरथ माझ्या
उजेड होण्या जळते
दुःख आवेगी त्यांचे
तमास तुझ्या का कळते?

कवितेस या माझ्या
दे ना चांदण काया
दे पांघरून तिजवर
तुझी मलमली माया

शब्दास भिडु दे माझ्या
तुझ्या आत्म्याचे मन्वंतर
मी सांधून घेईन सत्वर
चंद्राचे सुदुर अंतर....

"やraτa प"
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
३१.१२.२०२२






Friday, December 30, 2022

रावा हाक


हिरवे रावे गातील
पर्णहीन तरूंची गाणी?
किती ॠतु सोसावी
ही बहराची मनमानी?

पहाडांच्या काठावरती
धुके उभे का असते?
शिखराच्या माथ्यावरती
दुःख एकले बसते

मी हाक कशाला देवू
दरीत दुःख घुमते
झाडांच्या सावलीचे
करडे मन दमते

शिळ देत नाही
असला कसला रावा?
मलाच समजत नाही
तुझा मृगजळी कावा

मी नभाच्या कोप-याला
वचन कशाला देवू?
तुझ्या खिडकीतला रम्य
तारा कशाला होवू?

तु नभ बनशील तेंव्हाच
मी बनेन सप्तर्षी तारा
आणी धारेनही रंग
तुझा चमकणारा.....

प्रताप
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
३१.१२.२०२२










ओल्या चिमणीचे थवे



ओल्या चिमणीस रे!
द्या आसरा कोणी
मनी शांत खळाळता
भुगर्भातील पाणी

ओल्या हळदखुणांचे
ठसे कसे मोडावे ?
रातीच्या भुलवप्रहरी
स्वतःस कसे सोडावे?

शब्द थव्याचे गाणे
चांदण्याच्या कंठी फुटते
दुर उभ्या झाडाचे
फांदिवर काळीज तुटते

भग्न भिंतीस पाठमोरे
कोण उभे एकले?
माळावर कोणाचे डोळे
पाहुन वाट थकले?

फटफटेल पहाट म्हणूनी
तारे मंद का विझती?
शिणलेले काजवे कोठे
अनाथ एकले निजती?

मी विझता तारा घेवून
सकाळ पेटवून देतो
ओल्या चिमण्यांचे थवे
फांदिहून उठवून देतो...

प्रताप
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
३०.१२.२०२२












Thursday, December 29, 2022

कवितेचा फुलगंध...


शिशिरदिशेला निघतो
स्वप्नकाफिला माझा
दुःख उरात दडते
न करता गाजावाजा

अवकाशी उगवून येती
सप्तर्षी चांदणराशी
मी उभा विराणी गातो
तुझ्या एकट वेशीपाशी

कोण मुसाफिर म्हणूनी
ये तुही मग अनवानी
प्रतिक्षारत ही वळणवाट
न होवो.... दिनवाणी

दे पसाभर वास्तव
स्वप्नांची भरण्या झोळी
आणिक अंधार सारण्या
काजव्यांची एकलटोळी

नकोस पाहू चेहरा
आभास स्पर्शही टाळ
या शब्दफुलांच्या वेणा
देवहारातुन माळ

वाहून दे ही फुले
तुझा देव्हारा सजव
आवडलेच एखाद फुल..
तर...मुक अश्रुत भिजव

होतील इतर निर्माल्य
एखाद तुझा गजरा
कवितेचा फुलगंध
होईल मग साजरा....

प्रताप
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२९.१२.२०२२


















रितेपण


मी होतो रिता जरासा
घेवून तुझे दुरावे
पानगळीने जैसे येथे
बहरफुलास झुरावे

मी करू कशी आवेगी
आठवांची धुळधाण?
उतरून द्यावे तरूने
जसे शुष्क वाळके पान

मी फुल कोणते लगडू
झाड जणू झुंबरते
गाय जणू पान्हावली
सांयघडी हंबरते

मी गीत कोणते लिहू
जे तुला भारून जाईल
चांद कोणता शोधू
जो तुला धारून येईल

मी हाक कसली देवू
होईल तुला की व्याकुळ
बासरीने मोहरून जाईल
मग कृष्णसखीचे गोकुळ

मी त्यागु कसा मोह
होऊ कसा मी सन्यांशी
भरू कसे रितेपण
जे साचते हृदयापाशी...?

प्रताप
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२९.१२.२०२२


Monday, December 26, 2022

निशीगंधी तळवे


या पानसळसळी वेळी
मी स्तब्ध राहू कसे?
की ओटीस तुझ्या बिलगवू
रानातली मोरपिसे?

शांत तळ्याच्या काठी
मी करतो मुक धावा
गीत मनाचे माझ्या
चालते तुझ्या गावा

घे भेट त्या गीताची
शब्द कुशीला घेवून
घे तुझेच रूप बिलोरी
शब्दामधले पाहून

हा अनंतमुखी शोध तुझा
मी गीत पेरतो हळवे
दे निशीगंधास या अर्पुण
तुझे आसुस तळवे!!


प्रताप
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२६.१२.२०२२








Sunday, December 25, 2022

प्रकाश याचना


अंतरीचे तुफान
तरीही जळतो दिवा
ओळखुन सरावलेली
आठवणींची हवा

हवेस चेटूक नित्य
ती मंद गतीने वाहे
दिवा गाभा-यातला
दिपमाळ उसासून पाहे

तमास कसले गुज
नित्य मी करावे?
वात मनाची माझ्या
जळण्यास सरावे

मी काजळीच्या वाटेवरती
स्वप्न लपवू पाहतो
विझल्या वातीवरती तयांचा
काळा डाग राहतो

पुन्हा तिथुनच जळणे
वात थकत नाही
जळणे तिचे अंधारी
चुकता चुकत नाही

का थरारतो नित्य
तुझ्या देव्हा-यातील दिवा?
घे विचारून त्याला...
माझ्या वातीचा प्रकाश हवा?

प्रताप
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२५.१२.२०२२



स्पर्शकळप...


तुझिया आठवणींचा
पहा किती दरारा
क्षण ही निघत नाही
ध्रुवदिशेस भरारा

रातीच्या भिंतीआडूनी
जात्यावर कोण दळते?
मनातली माहेरवाशिण
जणू बापकुटीस हळहळते

अश्रुंनी तलाव सजतो
फुलतात मनात कमळे
पद्मगंधी एकोप्यातुन
मनात पुकार उमळे

रक्ताच्या पल्याडाहून
पुकारती तुला हाडे
पुसट कशाला व्हावेत
प्रेमभुलीचे धडे?

ख्रिस्तसुळावर येती
तुझ्या हाकांच्या वेणा
मी तळव्यावर सजवतो
आठवांच्या सुळखुणा

रंग कोणता असा
मी तमात कालवावा?
तुझ्या स्पर्शाचा कळप
नक्षत्रातुन बोलवावा....

प्रताप
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२५.१२.२०२२





Saturday, December 24, 2022

आभासातल्या उरभेटी


आत्मे विखुरले शब्द
डोंगरमाथी पेरणी
हंगामात का लगडते
फुलास माझ्या झुरणी?

पडवीत वाळके पान
आणतो कुठुन वारा?
दारात शिशिर रेंगाळे
पानगळ बहरणारा

मी पान कोणते वेचू
हिरव्या बहर कथेचे?
की निनाद टिपून घेवू
पडत्या दव व्यथेचे?

धवल दिशेला धुके
उज्वल त्याचा रंग
मी दिर्घ कुशीला घेतो
एकांताचा संग

दुर कुठे ती बासरी
मुकमुक्याने वाजे
राधेच्या लोचनाला
दव शुक्ल साजे

पायरवाचे ध्वनी
पुसट मला का वाटती?
अंधार साचला असता
गाभारी दिवे का पेटती?

ये! दिव्याच्या कवडशा
अंधार बनाच्या दाटी
स्पंदनास ऐकु याव्या
आभासातल्या उरभेटी...

○ प्रताप ○
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२५.१२.२०२२
















शिशिर चंदन


चंदनाचे हात माझे 
घेवू कसे माघारा?
गंधाचा कसा तुला
मग मिळेल धागादोरा?

या स्तबधी रातघडीला
कसले वाहते वारे?
शिशिर वाचवत असतो
पान पहा गळणारे!

केशर दिवे विझले
चंदेरी अंधार सजला
का भास तुझा कवटाळे
हमसून अवेळी मजला?

हे गर्दनिळे घनाचे थवे
अंधार भरून येता
रातीच्या वसंत सावलीला
शिशिर सांगतो कथा

पालवीच्या ॠचा हिरव्या
मग शोधती तुझा आसरा
कुशीसन्मूख आभास
चेह-याचा तुझ्या हसरा

अशा व्याकुळ वेळी 
कविता मला सुचते
एक कविता माझी
अनंत पानगळ वेचते....

○ प्रताप ○
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२५.१२.२०२२


Wednesday, December 14, 2022

दिवेलागणी


दिवेलागणी वेळी
मी काही मागत नाही
अंतःपुरीच्या आतले
गाव त्यागत नाही

गावाच्या वेशीवरती
गोरजधुळ उडते
दुःख कुणाचे हसरे
मनात मुक रडते

देव्हा-याला कसले
प्रश्नांचे पडते कोडे
संन्यस्त भावनेवरती
उडती मोहाचे शिंतोडे

मी मोहही त्यागत नाही
ना होतो मी संन्याशी
हात पसरतो मिटले
तुझ्या काळजापाशी

साचल्या अंधार वेळी
पेटव सांज दिवा तु
दे हृदयास माझ्या यावेळी
 कवडसा एक नवा तु!

○ प्रताप ○
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१४.१२.२०२२






चांदणधाव


नाव तुझे उमटावे
आत्म्याच्या भिंतीवरती
हे चंद्र मनातील माझ्या
अवकाश कडेवर झरती

झरल्या चंद्राखाली
ओल चंदेरी पसरे
पंख चकोरी आर्त
माळावरती घसरे

निनाद त्या पंखाचा
धरणीचा हो दुभंग
नावातील अक्षरांचा
हो हळवा एक अभंग

अभंग शिलेतुन मग मी
पुन्हा कोरावे तुझे नाव
हृदयाच्या नक्षत्र मिठीला
चांदण्याने घ्यावी धाव....


○ प्रताप ○
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१४.१२.२०२२






Sunday, December 11, 2022

गीत हाका-यांचे...


मशिदीच्या घुमटावरती
अजान वेळी पारवा
गर्द धुक्याच्या अंतरी
सांयआरतीचा गारवा

अशा पुकार घडीला
चांद उसासून निघतो
एक कोणाचा देव या
व्यथालयास बघतो

जोडलेले उंचावलेले हात
असे काय मागणे?
देवचाफ्याचे त्यावेळी
एकेक फुल त्यागने

अशा विभक्त घटीकेवर
मी तुझे दान मागतो
अजाण तुझ्या शहरावर
मग चंद्र बनून जागतो

उजेडात या कधी
येईल का अनाहूत चांदणे?
किती युगे चालेल हे
अदृश्य प्रार्थनालयाचे बांधणे?

कोरतो आहे मी शिल्प
आर्त पुका-याचे...
पोहचेल कधी तुझ्या अंतरी
गीत माझ्या हाका-यांचे...??

○ प्रताप ○
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१२.१२.२०२२




शब्द चकोर


लिहू कसले शब्द
काळजास भिडणारे?
जसे काफिले चकोरांचे
चंद्रमुखी उडणारे.....

गाठू कसा मध्य
चंद्र असता पुर्ण ?
उजळून आरास होईल
तम खिडकीतला जिर्ण....


○ प्रताप ○
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
११.१२.२०२२










अवचित सुगंधी होणे


उकलते जरासे
मनात साचलेले
ते अक्षर अंधूकसे
पुसटसे वाचलेले

लयीत पाताळाच्या
चांदण्याचे गात गाणे
उलटून जाती एकेक
मिटल्या पुस्तकाची पाने

हो ना तु ही अनोखी
कविता सुचलेली
काट्यामधूनी अलगद
फुलोरा वेचलेली

असु दे हातास या
सुगंधाचे तुझ्या देणे
जाणू दे मलाही
अवचित सुगंधी होणे..!

○ प्रताप ○
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
११.१२.२०२२






Thursday, December 1, 2022

विसरलेल्या लोककथा

स्वप्नभुमीत रूजते
आठवणींचे रंगीत बिज
अवकाशाच्या चांदणीला
देवून व्याकुळ निज

थवा ढगांचा अंधूक
चांदण्याची लोचने
स्वप्नांचे धागेदोरे
दिठीतुन व्यग्र वेचणे

बंदी त्या पावलांना
श्रृंखला कशी तुटावी?
आसक्तीच्या तळातली
निर्मोहकता कशी सुटावी?

घोड्यांचे थिजले डोळे
हरिणगतीला भिनले
मी वस्त्र कोणते ऐसे
अवघड पळात विणले?

या स्वप्नधाग्यांचे रंगीत
विणलेले भरजारी वस्त्र
वास्तवाच्या मयसभेत या
भाव माझे निर्वस्त्र

काय भारून सांगु
केवड्याच्या मी व्यथा?
तु जपशील ना माझ्या
विसरलेल्या लोककथा?
○ प्रताप ○
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२.१२.२०२२










राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...